इंदूर (मध्य प्रदेश)- अभिनेत्री सारा अली खानने उज्जैनमधील महाकाल मंदिराला भेट दिली होती. तिच्या या भेटीनंतर काही युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. अशा विरोधक युजर्सना सारा अलीने चोख प्रत्यूत्तर दिले आहे.
सध्या सारा अली खान जरा हटके जरा बचके चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. याच निमित्ताने मध्ये प्रदेशमध्ये इंदूरला पोहोचलेल्या साराने उज्जैनमधील महाकाल मंदिराला भेट देऊन पवित्र दर्शन घेतले होते. त्यानंतर तिच्यावर टीका होऊ लागली. याबद्दल पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना ती म्हणाली, 'मी माझे काम खूप गांभीर्याने घेते. मी लोकांसाठी, तुमच्यासाठी काम करते. तुम्हाला माझे काम आवडले नाही तर मला वाईट वाटेल पण माझ्या वैयक्तिक श्रद्धा माझ्या स्वत:च्या आहेत. ज्या भक्तिभावाने मी बांगला साहिब किंवा महाकालला जाईन त्याच भक्तीभावाने अजमेर शरीफला जाईन. मी भेट देत राहीन. लोक त्यांना वाटेल ते म्हणू शकतात, मला काही अडचण नाही. तुम्हाला एखाद्या ठिकाणची ऊर्जा आवडली पाहिजे...माझ्या उर्जेवर विश्वास ठेवा.'
मंदिरांना भेट दिल्याबद्दल अभिनेत्री सारा अली खान ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सारा अलीची आई अमृता सिंग यांनी तिची जडणडण खर्मनिरपेक्ष पध्दतीन केली असल्यामुळे ती सर्व धर्मियांचा आदर करते व सर्व पवित्र धर्म स्थळांना भक्तीभावाने भेट देते. हा तिच्या स्वतःच्या आस्थेचा आणि श्रेद्धेचा भाग आहे. नुकतेच तिने महादेव मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली. साराने मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील महाकालेश्वर मंदिरात भक्तीभावाने प्रार्थना केली. यावेळी तिने 'भस्म आरती'मध्येही सहभाग घेतला. भस्म आरती हा या प्राचिन मंदिरातील प्रसिद्ध विधी आहे. ब्रह्म मुहूर्तावर पहाटे 4 ते 5:30 च्या दरम्यान हा विधी केला जातो.
मंदिराच्या परंपरेचे पालन करून, तिने भस्म आरती दरम्यान गुलाबी रंगाची साडी नेसली होती. भस्म आरतीमध्ये महिलांना साडी नेसणे बंधनकारक असते. भस्म आरतीच्या वेळी तिने मंदिराच्या नंदीहालमध्ये बसून प्रार्थना केली. साराने गर्भगृहात 'जलाभिषेक'ही केला. विशेष म्हणजे, महाकाल मंदिरात जाण्याची तिची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी सारा अली खानने अनेकवेळा मंदिराला भेटी देऊन बाबा महाकालची पूजा केली आहे. मंदिर भेटीदरम्यान, सारा अली खान मंदिराच्या आवारात असलेल्या कोठी तीर्थ कुंडातही उभी राहिली राहू भक्तीभावात तल्लीन झाली होती.