मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटने देशभरात खळबळ उडाली असतानाच बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर धक्कादायक वक्तव्य केले आहे. रणवीर सिंगवर न्यूड फोटोशूट केल्यामुळे एफआयआरही नोंदवण्यात आला असला तरी त्याचे बॉलिवूड कुटुंबीय समर्थन करताना दिसत आहेत. आता विद्या बालनने धक्कादायक वक्तव्य करत रणवीर सिंगचा बचाव केला आहे.
विद्याचे वक्तव्य - सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विद्या बालन अभिनेता रणवीर सिंगच्या वादग्रस्त न्यूड फोटोशूटचे खुलेपणाने समर्थन करताना दिसत आहे. या फोटोशूटवर पापाराझींनी तिला प्रतिक्रिया विचारताच अभिनेत्री म्हणाली, 'काय प्रॉब्लेम आहे, पहिल्यांदाच एक माणूस असं करतोय.. आम्हालाही थोडे नेत्रसुख घेऊ द्या ( हमें भी आँखे शेकने दो )', असं बोलल्यावर विद्या जोरात हसायला लागते. त्याचे उत्तर ऐकून तेथे उपस्थित लोकही हसू लागतात. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.