मुंबई - Hua Mai Song Out :अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना स्टारर 'अॅनिमल' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. हिंदी आणि दाक्षिणात्य जोडी पहिल्यांदाच 'अॅनिमल' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'अॅनिमल' चित्रपटातील 'हुआ मैं' हे पहिले गाणे कालपासून चर्चेत आहे. मंगळवारी, 10 ऑक्टोबर रोजी या गाण्याचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. याशिवाय 'अॅनिमल'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची रिलीजची तारीख देखील जाहीर केली होती. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये रणबीर आणि रश्मिका विमानात एकमेकांना किस करताना दिसत आहे.
'गाणे हुआ मैं' बद्दल :'अॅनिमल' चित्रपटामधील पोस्टर, टीझर आणि ट्रेलरनंतर आता चित्रपटामधील 'हुआ मैं' गाणं रिलीज झालं आहे. या चित्रपटातील गाण्याला प्रीतमनं संगीत दिले आहे. 'हुआ मैं' गाण्याचे बोल मनोज मुंतशिर यांनी लिहिले असून हे गाणं गायक राघवसह प्रीतमनं गायले आहे. गाण्याच्या सुरुवातीला रश्मिका आणि रणबीरला घरच्यांकडून फटकारलं जातं आहे. त्यानंतर पुढच्या काही क्षणातचं हे जोडपे कुटुंबातील सदस्यांसमोर एकमेकांना लिप किस करतात. त्यानंतर हे जोडपे प्रायव्हेट जेटमध्ये जातात. त्यानंतर हे दोघेही जेटमध्ये देखील किस करतात. चित्रपटातील रश्मिकाच्या पात्राचे नाव गीतांजली आहे.