मुंबई - कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर मेगस्टार अमिताभ बच्चन याच्या ओठाचे एका महिलेने कौतुक केले. यानंतर त्यांनी आनंद चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा आपल्या ब्लॉगवर शेअर केला. अमिताभ यांचे ओठ लाल असल्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि डीओपी त्यांच्यावर सेटवर भडकले होते व लिपस्टिक का लावले म्हणून ओरडले होते.
१९७१ मध्ये रिलीज झालेल्या आनंद चित्रपटाचे दिग्दर्शन हृतिकेश मुखर्जी यांनी केले होते. या चित्रपटात अमिताभसह राजेश खन्ना यांच्या मुख्य भूमिकेत होते. यात सुमिता सान्याल, रमेश देव आणि सीमा देव देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते.
अमिताभ यांनी किस्सा सांगताना आनंद चित्रपटातील एक फोटो शेअर करत आपल्या ब्लॉगर लिहिले की, ''माझे ओठ खूप लाल होते. मी कॅमेऱ्यासमेर गेलो असता दिग्दर्शक आणि डीओपी माझ्याकडे ओरडत आले आणि म्हणाले की ओठांना लिपस्टिक का लावले आहेस. आपण कोण समजत आहात, आधी ते पुसून टाका!!! ".