मुंबई - चित्रपट जगतातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची आजी पद्मा राणी ओमप्रकाश यांचे मुंबईत निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राकेश रोशन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राकेश यांनी कुटुंबासाठी हा अत्यंत दुःखाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. हृतिक रोशनचे त्याच्या आजी-आजोबांवर खूप प्रेम होते आणि ते त्याच्या सर्वात जवळचे होते. 2019 मध्ये हृतिकने त्याचे आजोबा जे ओम प्रकाश गमावले होते. जे ओम प्रकाश हे चित्रपट निर्माता-दिग्दर्शक होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशनची आजी पद्मा राणी यांचा मृत्यू वृद्धत्वाशी संबंधित आरोग्य समस्यामुळे झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्या रोशन कुटुंबासोबत राहत होत्या आणि संपूर्ण कुटुंब त्यांची काळजी घेत होते. हृतिकची आई पिंकी रोशन घरात सर्वात जास्त आईची काळजी घेत असे. पिंकी रोशननेही आपल्या आईसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते.