महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sussanne Khan lauds Murthy : करीना कपूरला खडे बोल सुनावणाऱ्या नारायण मूर्तींच्या वक्तव्यावर सुझैन खानची प्रतिक्रिया - सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी करीना कपूरबाबत केलेल्या वक्तव्यावर ह्रतिक रोशनची पूर्व पत्नी सुझैन खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मूर्ती यांनी करीना खानच्या अहंकाराबद्दल उदाहरण देऊन भाष्य केले होते.

Sussanne Khan lauds Murthy
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती

By

Published : Jul 29, 2023, 5:45 PM IST

मुंबई- ह्रतिक रोशनची पूर्व पत्नी सुझैन खानने इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी एका कार्यक्रमात करीना खानवर टीका केली होती त्यावर भाष्य केले आहे. नारायण मूर्ती यांचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. करीना कपूर खानने प्रवासात चाहत्यांना दिलेली वागणून मूर्ती यांना पटली नव्हती.

आयआयटी विद्यार्थ्यांसमोर बोलत असताना आपल्यातील अहंकाराला दूर ठेवा असे नारायण मूर्ती सांगत होते. तेव्हा मंचावर त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्तीही हजर होत्या. यावेळी बोलताना नारायण मूर्ती म्हणाले की, 'मी एकदा इंग्लंडहून भारतात विमानाने परत येत असताना माझ्या बाजूच्या सीटवर अभिनेत्री करीना कपूर बसली होती. अनेक लोक तिला भेटायला येत होते आणि तिला हाय हॅलो करत होते. पण त्यांच्याकडे ढुंकून पाहण्याचीही तसदी तिने घेतली नाही. हे पाहून मला थोडे आश्चर्य वाटले. माझ्याकडे जेव्हा कोणीतरी भेटायला यायचे तेव्हा मी उभे राहून त्याच्याशी बोलायचो. एकादा मिनीट बोलल्याने त्यांना बरे वाटते, तेवढीच त्यांची अपेक्षा असते.'

या चर्चेमध्ये नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी करीना कपूरचे समर्थन केले आणि म्हणाल्या, 'तिचे मिलीयन्समध्ये चाहते आहे आणि ती थकलेली पण असेल, त्यामुळे ती बोलू शकली नसेल'. यावर मूर्ती म्हणाले की, 'अडचण ती नाही, तर अडचण ही आहे की, एकादा तुमच्याकडे आदराने येतो, तेव्हा तुम्हालाही त्याचा आदर राखला पाहिजे. मला वाटतं की ते महत्त्वाचे आहे. मला वाटते की हा अहंकार कमी करण्याचा हा एक मार्ग आहे. बस्स इतकंच.'

नारायण मूर्तींचा हा व्हिडिओ अनेक न्यूज पोर्टलनी शेअर केला आहे. यावर व्यक्त होताना सुझैन खानने लिहिले की, 'तुम्ही योग्य बोललात मूर्ती साहेब', म्हणत टाळ्या वाजवत असलेला इमोजी तिने टाकला आहे. करीना कपूर आणि ह्रतिक रोशन यांनी 'कभी खूशी कभी गम', 'यादें', 'मैं प्रेम की दिवानी हूँ' आणि 'मुझसे दोस्ती करोगे' यासारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details