मुंबई - बॉलिवूड स्टार हृतिक रोशन सध्या पॅरिसमध्ये त्याची प्रेयसी सबा आझादसोबत आहे. सबाने नुकतेच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हे लव्हबर्ड्स प्रेमाच्या शहरात खूप आनंद लुटत असल्याचे दिसते.
शुक्रवारी सबाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर कॅब्रिओलेट कारमध्ये हृतिकसोबतचा तिचा लाँग ड्राईव्हचा व्हिडिओ शेअर केला. सबाने तिच्या कॅमेऱ्यात हिरवेगार दृष्य टिपली आहेत तर हृतिक कार चालवताना दिसत आहे.
तत्पूर्वी, हृतिक सबाचा सुंदर फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर बनला होता. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांचे नाते अधिकृत करणारे हे जोडपे सध्या एकत्र सुट्टीचा आनंद घेत आहेत. हृतिक आणि सबा आझाद ही नवीन बॉलिवूड जोडी सध्या मनोरंजन जगतात चर्चेचा विषय ठरली आहे. एका फोटोत ती रेस्टॉरंटमध्ये बसलेली दिसते. कॅमेऱ्यापासून दूर पाहत असताना तिच्यासमोर कॉफीचा कप दिसतो.
कामाच्या आघाडीवर, हृतिक अभिनेता सैफ अली खानसोबत विक्रम वेधा या तमिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे आणि त्यात राधिका आपटे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
हेही वाचा -'पोन्नियिन सेल्वन'चा टीझर रिलीज, 'राणी'च्या भूमिकेत झळकली ऐश्वर्या राय बच्चन