मुंबई :बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची बॉडी ही फार सुंदर आहे. वयाच्या 49 वर्षी देखील तो फार आकर्षिक दिसतो. हृतिक स्वता;ला फिट ठेवण्यासाठी फार परिश्रम करतो. सोमवारी, हृतिकने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो फार हॉट दिसत आहे. हृतिक या फोटोत पाठ दाखवताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'बॅक डे'. फोटोत त्याने काळी टोपी आणि काळी पँट परिधान केली आहे. त्याने हा फोटो पोस्ट करताच, त्याच्या चाहत्यांनी या फोटोवर फार जास्त प्रमाणात कमेंट केल्या आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हृतिक रोशनचा हॉट फोटो : हृतिकच्या पोस्टवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले, 'एलेक्सा प्रे आय एम ब्रायटनिंग सेक्सी बॅक (Alexa play: I'm bringing Sexy Back)'. हृतिकच्या फिटनेसबद्दलच्या प्रेमाचे कौतुक करताना, दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'बॉडी अशी बनवायची की चार लोकांनी बघितलीच पाहिजे' तर आणखी एका चाहत्याने लिहिले, 'तुम्ही या जगातील सर्वात सुंदर आणि नम्र व्यक्ती आहात, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे'. तसेच काहींनी चाहत्यांनी 'हॉटेस्ट हृतिक रोशन सर.' असेही लिहले आहे.