पणजी (गोवा) :हृतिक रोशन-सबा आझाद आणि सुझैन खान-अर्सलान गोनी हे कथित जोडपे काही दिवसांपूर्वी गोव्यात एकत्र दिसले होते. सोशल मिडीयावर त्यांची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. ज्यात हृतिक आणि सुझान अनुक्रमे साबा आणि अर्सलान यांच्या नवीन जोडीदारासोबत दिसत आहेत.अभिनेत्री पूजा बेदीने गेट-टूगेदरमधील छायाचित्रे शेअर केली असून, यात दिग्दर्शक अभिषेक कपूरसह सुझानची भावंडे फराह खान अली आणि झायेद खान देखील उपस्थित होते. हृतिक काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये तर साबा गुलाबी रंगाच्या सुंदर पोशाखात चमकदार दिसत होती.
2000 मध्ये केले लग्न