मुंबई- बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. हौशी फोटोग्राफर्सच्या समाधानासाठी त्यांनी फोटोसाठी पोझ दिल्या. हे लव्हबर्ड्स नेहमीपेक्षा जास्त लहज वावरताना दिसून आले.
गेल्या पंधरवड्यापासून सबा आझाद हृतिकसोबत त्यांच्या युरोपमधील रोमँटिक सुट्टीच्या आठवणी जमा करण्यात गुंतली होती. काल रात्री भारतात परतण्यापूर्वी या जोडप्याने व्हिंटेज कारमध्ये लाँग ड्राईव्ह केली, लंडनमध्ये काही जॅझ संगीताचा आनंद घेतला आणि काही चवीष्ठ अन्नाचा आस्वाद घेतला. विमानतळावर हे जोडपे पोहोचल्यानंतरचे त्यांचे व्हिडिओ काही काळातच व्हायरल झाले.
फेब्रुवारीमध्ये एकत्र डिनर डेटवर दिसल्यापासून हृतिक आणि सबाविषयीच्या अफवा सुरू झाल्या. नंतर सबा देखील हृतिकच्या कुटुंबात गेट-टूगेदरसाठी सामील झाली होती. निर्माता करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत पहिल्यांदा एकत्र दिसल्यापासून हृतिक आणि सबा हे चर्चेत आले आहेत.