मुंबई - Live performance by Saba Azad :अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'खो गए हम कहाँ'च्या ट्रेलर लॉन्चला अभिनेता हृतिक रोशन त्याची मैत्रीण सबा आझादसोबत पोहोचला होता. यावेळी ट्रेलर बरोबरच चित्रपटाचा अल्बम देखील प्रदर्शित झाला. या अल्बमध्ये सबा आझादनं गायलेलं 'आय वान्ना सी यू डान्स' हे गाणे देखील आहे. ट्रेलर लॉन्चच्या स्टार स्टडेड सोहळ्यात सबा आझाद तिचे गाणे प्रेक्षकांसमोर लाईव्ह सादर करताना दिसली.
इंस्टाग्रामवर सबाने तिच्या परफॉर्मन्सच्या काही क्लिप इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केल्या आहेत. यातील प्रत्येक क्लिप मंत्रमुग्ध करणारी आणि ताल धरायला लावणारी आहे. एका क्लिपमध्ये ती 'आय वान्ना सी यू डान्स' हे गाणे भव्य मंचावर झगमगाटात गाताना दिसते. यावेळी प्रेक्षकही तिच्या गाण्यावर डोलताना दिसतात. दुसऱ्या एका झलकमध्ये सबा गाणे सादर करत असताना या गाण्यावर अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव डान्स करताना दिसतात. तिघे मिळून तिला डान्स करण्याचा आग्रह धरतात. त्यांचा आदर करत सबाही डान्स स्टेप्स करताना दिसते.
सबा आझादचे हृतिक रोशननं केलं कौतुक 'खो गए हम कहाँ' या आगामी चित्रपटातील 'आय वान्ना सी यू डान्स' हे गाणं संगीतकार सचिन जिगर यांनी संगीतबद्ध केलंय आणि याला सबा आझादनं स्वरसाज चढवला आहे. अंकुर तिवारी यांनी लिहिलेलं हे गाणं खूपच श्रवणीय झालं आहे. ट्रेलर लॉन्च दरम्यान सबानं केलेल्या परफॉर्मन्सचं कौतुक तिचा प्रियकर हृतिक रोशनने केलं आहे. त्यानं तिची इन्स्टाग्राम पोस्ट पुन्हा लाल हृदयाचा इमोजीसह शेअर केले आहे.
अर्जुन वरेन सिंग दिग्दर्शित 'खो गये हम कहाँ' बद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटात अनन्या पांडे अहानाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सिद्धांत चतुर्वेदी इमाद आणि आदर्श गौरव नीलच्या भूमिकेत दिसणार आहे. 2020 च्या दशकात सोशल मीडियाच्या जगात नॅव्हिगेट करणार्या 'कमिंग-ऑफ-ऑफ-डिजिटल-युग' अशी कथा असलेली ही तीन मित्रांची एक गोष्ट आहे. मुंबईच्या पार्श्वभूमीवर तीन मित्रांच्या मैत्रीचे विविध पैलू या ट्रेलरमध्ये अधोरेखित करण्यात आले आहेत. हा चित्रपट २६ डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे
हेही वाचा -
- 'जलसा'बाहेर जमलेल्या चाहत्यांना अमिताभ बच्चन यांनी नातू अगस्त्य नंदासोबत केले अभिवादन
- 'टायगर 3'च्या सेटवरील सलमान खान आणि शाहरुख खानचे फोटो व्हायरल
- खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असणार दिवंगत दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांना समर्पित