हैदराबाद: यशराज फिल्म आणि अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2'च्या सिकव्लचमध्ये स्पाय युनिव्हर्सची भूमिका ही अभिनेता हृतिक रोशन साकारणार आहे. हृतिक रोशनने शनिवारी ज्युनियर एनटीआरला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. हृतिक आणि ज्युनियर एनटीआर रूपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. कारण याबाबत हृतिकने त्यांच्या ट्विटमध्ये असे लिहले 'तुम्हाला आनंददायी दिवस आणि पुढील वर्षभर कृतीने भरभरून जावो. युद्धभूमीवर तुमची वाट पाहत आहे माझ्या मित्रा. तुमचा दिवस आनंद आणि शांतीपूर्ण जावो… जोपर्यंत आम्ही भेटत नाही तोपर्यंत पुतिना रोजु सुभकंक्षलु मित्रमा',त्यामुळे सध्याला, हृतिक आणि ज्युनियर एनटीआर सोबत स्क्रिन शेअर करणार हे स्पष्ट झाले आहे. तसेच ट्विटमध्ये 'युद्धभूमी'चा उल्लेख आला आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, पडद्यावर आपल्याला ज्युनियर एनटीआर आणि हृतिक जोडी बघायला मिळणार आहे. त्यामुळे 'वॉर 2' ज्युनियर एनटीआर आणि हृतिक एकत्र असणार आहे.
वॉर 2 सिकव्ल: भारतीय चित्रपटसुष्टीत सध्याला मोठ्या बजटचे चित्रपट बनत आहे. तसेच भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सनी सुपर-स्पाय म्हणून भूमिका साकारल्या आहे, त्यात पठाण चित्रपटातील भूमिकेत शाहरुख खान, टायगरच्या भूमिकेत सलमान खान, कबीरच्या भूमिकेत हृतिक रोशन, रुबाईच्या भूमिकेत दीपिका पदुकोण, झोयाच्या भूमिकेत कतरिना कैफ आणि जिमच्या भूमिकेत जॉन अब्राहम त्यामुळे सध्या या चित्रपटाची कहाणी कशी असेल हे बघणे फार मनोरंजक असेल.