मुंबई - Deepika and Hrithik BTS Pic : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' चित्रपट 25 जानेवारी 2024 रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी या चित्रपटामधील 'शेर खुल गए' हे पहिलं गाणं रिलीज केलं होतं. 'शेर खुल गए' हे पार्टी साँग आहे. 'फायटर' या चित्रपटातील हे गाणं चाहत्यांना खूप आवडलं. दरम्यान आता या गाण्याच्या शूटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेनं पाहत आहे. 'फायटर'मध्ये हृतिक आणि दीपिका अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.
हृतिक रोशनचा व्हिडिओ व्हायरल :'फायटर' कोरिओग्राफर बॉस्को मार्टिसनं हृतिक रोशन आणि टीमसोबत टिपलेले क्षण इंस्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं , 'शेर खुल गए हृतिक रोशन आणि माझी टीम सिद्धार्थ आनंद, सचित पाउलोस, रजत पोद्दार यांच्यासोबत कॅप्चर केलेला शूटिंगचा एक बीटीएस (BTS) क्षण''. व्हिडिओमध्ये हृतिक गाण्याच्या तालावर डान्स करताना दिसत आहे. व्हि़डिओत या गाण्याचा कोरिओग्राफर संपूर्ण टीम हृतिकचं कौतुक करत असल्याचं दिसत आहे. याशिवाय हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा कोरिओग्राफर बॉस्को मार्टिससोबतचा 'शेर खुल गए'च्या सेटवरील एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.