महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसोबत साजरी केली दिवाळी - हृतिक रोशन आणि सबा आझाद दिवाळी

या दिवाळीत बॉलीवूड स्टार्स खूप झगमगाटात दिसले. बॉलिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशननेही गर्लफ्रेंड सबा आझादसोबत दिवाळी साजरी केली आहे.

हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसोबत साजरी केली दिवाळी
हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसोबत साजरी केली दिवाळी

By

Published : Oct 25, 2022, 3:03 PM IST

मुंबई- यावर्षी सर्व बॉलीवूड स्टार्सनी दिवाळी उत्साहात साजरी केली. ग्लॅमर आणि गॉर्जियस लूकमध्ये कलाकार दिवाळीचा आनंद लुटताना दिसले. गायक सबा आझादसोबत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या हृतिक रोशनने त्याची नवीन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत दिवाळी साजरी केली आहे.

सबा आझादने हृतिक रोशनसोबतचा तिचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर प्रेमाची चमक स्पष्ट दिसत आहे. दिव्यांचा सण दिवाळीच्या दिवशी या जोडप्याचे प्रेम सर्वांच्या समोर आले आहे. हा फोटो शेअर करत सबा आझादने हॅप्पी दिवाळी असे लिहिले आहे.

हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसोबत साजरी केली दिवाळी

त्याचबरोबर हृतिक रोशनच्या चाहत्यांनीही त्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हृतिक आणि सबा आझाद हे जोडपे बॉलीवूड सेलिब्रिटींच्या पार्टीत हातात हात घालून पोहोचले होते. हृतिक रोशन आणि सबा आझादबद्दल असे बोलले जात आहे की त्यांचे हे नाते लग्नापर्यंत जाईल. हृतिक आणि सबाने त्यांच्या लंडन व्हेकेशनचे फोटो शेअर करून त्यांच्या प्रेमाची पुष्टी केली आहे.

हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता शेवटचा विक्रम वेधा या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खान मुख्य भूमिकेत होता. हृतिकच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्यात दीपिका पदुकोणसोबत फायटर आणि वॉर 2 यांचा समावेश आहे.

हेही वाचा -'कंतारा' निर्मात्यांवर गाणे चोरल्याचा थाईकुडम ब्रिजचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details