महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सैफ अली खान आणि हृतिक रोशन यांचा थरारक ड्रामा विक्रम वेधा ट्रेलर रिलीज

सैफ अली खान आणि हृतिक रोशन एकमेकांसमोर ताकदीने टक्कर घेताना दिसणार आहेत. त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या विक्रम वेधा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. २ मिनीटे आणि ५० सेकंदाचा हा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा व उत्कंठा वाढवणारा आहे.

By

Published : Sep 8, 2022, 3:24 PM IST

सैफ अली खान आणि हृतिक रोशन
सैफ अली खान आणि हृतिक रोशन

मुंबई - हृतिक रोशन आणि सैफ अली खानयांची मुख्य भूमिका असलेल्या विक्रम वेधा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. २ मिनीटे आणि ५० सेकंदाचा हा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा व चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा आहे. दोन्ही स्टार्स दमदार अ‍ॅक्शन करताना दिसत आहेत. या चित्रपटात हृतिक रोशन 'वेधा'ची भूमिका साकारत आहे तर सैफ अली खानने इन्स्पेक्टर विक्रमची भूमिका साकारली आहे.

या ट्रेलरमध्ये हृतिक रोशन वेधाच्या भूमिकेत अतिशय आक्रमक दिसत असून भरपूर अॅक्शन करताना तो दिसणार आहे. या भूमिकेत तो चपखल दिसत असून या साहसी आणि कणखर भूमिकेसाठी त्याने भरपूर तयारी केली आहे. या चित्रपटासाठी अत्यंत अवघड असे स्टंट त्याने स्वतः केले आहेत. या चित्रपटासाठी पार्श्वसंगीतही अतिशय समर्पक असे वाटत आहे.

विक्रमच्या भूमिकेतील सैफ अली खान अत्यंत थंड डोक्याने विचार करणारा हुशार पोलीस इन्स्पेक्टर रंगवला आहे. दोघांच्यातील पडद्यावरील संघर्ष प्रेक्षकांना नक्कीच आवडू शकतो. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड चित्रपटाकडे जी प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे त्यातून पुन्हा प्रेक्षक थिएटरकडे परत आणण्याचे काम विक्रम वेधा करु शकतो.

विक्रम आणि बेताल या भारतीय लोककथेवर आधारित हा चित्रपट गुंड वेधाला पकडून मारणाऱ्या विक्रम या कठोर पोलीस अधिकाऱ्याची कथा आहे. या चित्रपटात सैफ अली खान विक्रमची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात राधिका आपटेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.'विक्रम वेधा' हा त्याच नावाच्या तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रिमेक आहे. आर माधवन आणि विजय सेतुपती यांनी तमिळ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे पुष्कर आणि गायत्री हे त्याच्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शक आहेत. याची निर्मिती एस शशिकांत आणि भूषण कुमार यांनी केली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपट जगभरातील सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

हेही वाचा -बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार कपिल शर्माच्या 'झ्विगाटो'चा प्रीमियर

ABOUT THE AUTHOR

...view details