महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर'चा टीझर अखेर लॉन्च - दीपिका पदुकोणच्या फायटरचा टीझर

Fighter teaser out : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा खूप काळ प्रतीक्षा सुरू असलेला 'फायटर' चित्रपटाच्या टिझरचे अखेर लॉन्चिंग झालं आहे. हृतिकच्या चाहत्यांसाठी हा एक थररक सिनेमॅटिक हवाई अनुभव आहे. हा आगामी एरियल अ‍ॅक्शनर चित्रपट 'पठाण'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करत आहे.

Fighter teaser out
'फायटर'चा टीझर अखेर लॉन्च

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 1:30 PM IST

मुंबई- Fighter teaser out : सर्वाधिक चर्चेत असलेल्या सिनेमॅटिक 'फायटर' चित्रपटाच्या मारफ्लिक्स बॅनरने रोमांचक काउंटडाउन सुरू केले आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर शुक्रवारी प्रदर्शित झाला. उत्कंठा वाढवणारा थरारक टिझर प्रेक्षकांना कथानकाचा ओझरता अंदाज देत मोहून टाकत आहे.

'फायटर' टीझरचे लॉन्चिंग करण्यापूर्वी, मार्फलिक्सने चाहत्यांना एका रहस्यमय रेडिओग्राम संदेशासह उत्सुक बनवले होते. टीझरचा काउंटडाऊन सुरू करुन शुक्रवारी 11 वाजता याचं लॉन्चिंग होणार असल्याचं सांगितलं होतं. कालपासून प्रतीक्षा करणाऱ्या प्रेक्षकांना या टिझरनं एक जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव बहाल केला आहे. 'फायटर' चित्रपटाचे कॅरेक्टर पोस्टर्स उघड झाल्यापासून बझ फायटरची जाहिरात सामुग्री वाढत चालली आहे. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया (पॅटी), दीपिका पदुकोण स्क्वाड्रन लीडर मीनल राठौर (मिन्नी) म्हणून आणि अनिल कपूर कमांडिंग ऑफिसर, ग्रुप कॅप्टन राकेश जा सिंग (रॉकी) या व्यक्तीरेखा साकारत आहेत.

'फायटर' चित्रपटात स्टार कास्टची मांदियाळी : 'फायटर' या चित्रपटातून पुन्हा एक धमाका करण्यासाठी दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद सज्ज झालेत. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या व्यतिरिक्त करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, तलत अझीज, संजिदा शेख, आमिर नाईक आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

'फायटर' चित्रपटाची फ्रँचायझी बनणार - या चित्रपटाची स्क्रप्ट लिहित असतानाच यांच्या निर्मात्यांनी चिपटाची फ्रँचायझी बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचं मजतंय. दिग्दर्शक सिद्धर्थ आनंद 'टायगर व्हर्सेस पठाण'चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर फायटर 2 सिक्वेल चित्रपटाची निर्मिती सुरू करेल अशी चर्चा आहे.

'बँग बँग' आणि 'वॉर' सारख्या चित्रपटांसह यशस्वी चित्रपटानंतर सिद्धार्थ आनंदसोबत फायटर हा हृतिकचा तिसरा चित्रपट आहे. भारताच्या या पहिल्याच जबरदस्त एरियल अ‍ॅक्शन चित्रपटात दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन हे बॉलिवूडमधील दोन आघाडीचे उत्कृष्ट कलाकार पहिल्यांदा एकत्र येत आहेत. 2021 मध्ये 'फायटर'ची घोषणा करण्यात आली होती तर टीमने या वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये शूटिंग पूर्ण केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details