मुंबई - Fighter Trailer Date OUT : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिला एरियल अॅक्शन चित्रपट 'फायटर' बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. 'फायटर' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूप कमी वेळ शिल्लक आहे. सध्या हृतिक आणि दीपिकाचे चाहते या चित्रपटाची वाट आतुरतेनं पाहत आहेत. 'फायटर' चित्रपटातील आतापर्यंत तीन गाणी आणि टीझर रिलीज झाला आहे. हृतिक आणि दीपिकाची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसत आहे. दरम्यान 'फायटर'च्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे.
'फायटर'चा ट्रेलर कधी होणार रिलीज: 'फायटर' हा 25 जानेवारी 2024 बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा 15 जानेवारीला रिलीज होणार आहे. आता चाहत्यांना ट्रेलर रिलीजसाठी आणखी 6 दिवस वाट पाहावी लागणार आहे. फायटरच्या निर्मात्यांनी याबाबत पुष्टी केलेली नाही. हृतिक रोशन उद्या म्हणजेच 10 जानेवारीला त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करणार आहे. 'फायटर' चित्रपटामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण व्यतिरिक्त करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, अनिल कपूर, संजीदा शेख, तलत अझीझ आणि इतर कलाकार दिसणार आहेत.