महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

उर्फीच्या साहसावर हनी सिंग फिदा, म्हणाला: "मुलींनी तिच्याकडून शिकले पाहिजे" - मुलींनी तिच्याकडून शिकले पाहिजे

रॅपर यो यो हनी सिंगने उर्फी जावेदचे कौतुक केले आणि सांगितले की देशातील इतर मुली तिच्यापासून प्रेरणा घेऊ शकतात. त्याने एका म्युझिक व्हिडिओमध्ये उर्फीसोबत सहयोग करण्याबद्दलही सकारात्मक विचार बोलून दाखवला.

उर्फीच्या साहसावर हनी सिंग फिदा
उर्फीच्या साहसावर हनी सिंग फिदा

By

Published : Jan 7, 2023, 5:00 PM IST

Updated : Jan 9, 2023, 2:22 PM IST

मुंबई - बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद बोल्ड फॅशन स्टेटमेंटसाठी सतत चर्चेत असते. अलीकडेच तिला राजकारणी चित्रा वाघ यांनी लक्ष्य केले आणि तिने सार्वजनिकपणे 'नग्नता' केल्याबद्दल तिच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. त्यानंतर सर्वांच्या नजरा उर्फी जावेदकडे वळल्या आहेत. सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट, व्हिडिओ आणि फोटो पुन्हा पुन्हा पाहिले जात आहेत. आता तिच्या या अदांवर गायक यो यो हनी सिंगदेखील फिदा झाला आहे.

मीडियाला दिलेल्या मुलाखतीत हनी म्हणाला: "मला ती मुलगी (उर्फी) खूप आवडली. ती खूप धाडसी आहे. जो अपनी जिंदगी अपने तारीके से जीना चाहती है. आपल्या देशातील मुलींनी तिच्याकडून काहीतरी शिकले पाहिजे.

रॅपर 'बेगानी नार', 'अचको मचको', 'हाय हील्स', 'ब्रेक अप पार्टी' यांसारख्या हिट ट्रॅकसाठी ओळखला जातो आणि त्याने त्याचे संगीत अल्बम देखील रिलीज केले आहेत आणि 'कॉकटेल' आणि 'मस्तान' सारख्या चित्रपटांमध्ये गायले आहे.

हनी सिंग पुढे म्हणाला: "तुम्ही कुठून आला आहात आणि तुम्ही कोणत्या धर्माचे, जातीचे किंवा घराचे आहात याची पर्वा न करता, कोणाला न घाबरता, तुमच्या मनात जे येईल ते करा."

त्याने एका म्युझिक व्हिडिओमध्ये उर्फीसोबत सहयोग करण्याबद्दल देखील बोलले आणि म्हणाला: "होय नक्कीच जर एखादे चांगले गाणे असेल ज्यामध्ये ती खूप चांगली फरफॉर्म करु शकेल असे मला वाटते. मी तिला शुभेच्छा आणि समर्थन देतो."

उर्फी 'मेरी दुर्गा', 'बेपन्नाह', 'ये रिश्ता क्या कहलाता है' यासारख्या अनेक टीव्ही शोचा भाग आहे आणि ती 'बिग बॉस OTT' सारख्या रिअॅलिटी शोमध्ये आणि सध्या 'Splitsvilla X4' वर दिसली होती.

चित्रा वाघ उर्फी जावेद वाद - उर्फी जावेदने परिधान केलेल्या तोकड्या कपड्यावरुन चित्रा वाघ यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर सोशल माध्यमातून चांगलाच हल्लाबोल होत आहे. उर्फी जावेदनेही डियर चित्रू असे ट्विट करुन या वादाला चांगलीच फोडणी दिली होती. त्यामुळे संतापलेल्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर हल्लाबोल करत महिला आयोगाला हे दिसत नाही का असा सवाल केला होता. त्यामुळे चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद सोशल माध्यमातून चांगलाच रंगत आहे.

चित्रा वाघ उर्फी जावेद वादात रुपाली चाकणकर यांची एंट्री - उर्फी जावेद सार्वजनिक ठीकाणी तोकडे कपडे परिधान करते, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महिला आयोगाला हे दिसत नाही का असा सवाल चित्रा वाघ यांनी करत महिला आयोगावर टीका केली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही चित्रा वाघ संजय राठोड आणि त्यांच्या इतर पक्षातील नेत्यांवर काही बोलत नाहीत. मात्र कपड्यांवरुन टीका करत असल्याचा हल्लाबोल चित्रा वाघ यांच्यावर केला होता. त्यामुळे चित्रा वाघ या एकाच वेळी उर्फी जावेद, रुपाली चाकणकर आणि आता अंजली दमानिया यांच्याशी लढत आहेत.


Last Updated : Jan 9, 2023, 2:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details