नवी दिल्ली Honey Singh Divorce : प्रसिद्ध गायक/रॅपर हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार यांच्या घटस्फोटाला दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयानं मंगळवारी मंजुरी दिली. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश परमजीत सिंग यांनी घटस्फोट मंजूर केला.
घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल होता : हनी सिंग विरुद्ध त्याच्या पत्नीनं घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. न्यायालयानं या दोघांमध्ये समेट घडवून आणला. यानंतर हनी सिंगच्या पत्नीनं खटला मागे घेतला. शालिनी तलवारनं, हनी सिंग आणि त्याचे कुटुंबीय क्रूर आणि हिंसक असल्याचा आरोप केला होता. निकाल देताना न्यायाधीशांनी हनी सिंगला विचारलं की त्याला त्याच्या पत्नीसोबत राहायचं आहे का? ज्यावर त्यानं नाही असं उत्तर दिलं. हनी सिंगच्या वतीनं वकील ईशान मुखर्जी, अधिवक्ता अमृता चॅटर्जी आणि जसपाल सिंग यांनी बाजू मांडली. तर वकील विवेक सिंह यांनी शालिनी तलवार यांची बाजू मांडली.
कशी झाली तडजोड : शालिनी तलवारनं हनी सिंगकडे १० कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतु दोघांमध्ये १ कोटी रुपयांवर समेट झाला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हनी सिंगनं एक कोटी रुपयांचा धनादेश दिला होता. शालिनी तलवारनं हनी सिंगवर फसवणुकीचे आरोप करताना, त्याचे इतर महिलांशीही शारीरिक संबंध असल्याचं म्हटलं होतं. याशिवाय हनीनं तिचं मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोपही तिनं केला होता.
२०११ मध्ये लग्न झालं होतं : हनी सिंग आणि शालिनी तलवार यांनी लग्नाआधी एकमेकांना डेट केलं होतं. स्वत: हनी सिंगनं एका रिअॅलिटी शोमध्ये याचा खुलासा केला होता. त्यानंतर दोघांनी २०११ मध्ये एका गुरुद्वारामध्ये शीख रितीरिवाजांनुसार लग्न केलं. दोघांचं लग्न अत्यंत गुपचूप पार पडलं. या लग्नाला फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. लग्नाच्या ३ वर्षानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या. तेव्हा दोघांचं लग्न आधीच झाल्याचं उघड झालं.
हेही वाचा :
- Honey Singh Death Threat : हनी सिंगला जीवे मारण्याची धमकी, गोल्डी ब्रारने पाठवली व्हॉईस नोट
- Honey Singh Breakup : एक वर्ष डेट केल्यानंतर हनी सिंगने गर्लफ्रेंड टीना थडानीसोबत केले ब्रेकअप; जाणून घ्या