महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Tiger 3 towel fight scene : हॉलिवूड स्टार मिशेलनं सांगितला कतरिनासोबतच्या टॉवेल फाईट सीन्सचा अनुभव - Experience the towel fight scenes

Tiger 3 towel fight scene : 'टायगर 3' चित्रपटातील मिशेल ली आणि कतरिा कैफ यांच्यातील टॉवेल फाईट सीक्वेन्स प्रेक्षकांना सर्वाधिक पसंतीचा सीन बनलाय. यामध्ये दोघेही शरीरावर फक्त टॉवेल गुंडाळून मारामारी करताना दिसतात. टॉवेल सावरत चपळ फाईट करणं कसं खडतर आव्हान होतं, याचा खुलासा मिशेल ली हिनं केला आहे.

Tiger 3 towel fight scene
टॉवेल फाईट सीन्सचा अनुभव

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 3:10 PM IST

मुंबई - Tiger 3 towel fight scene : हॉलिवूड अभिनेत्री मिशेल ली चपळ फाईट सीक्वेन्स शूट करण्यात तरबेज मानली जाते. ती 'टायगर 3' चित्रपटात कतरिना कैफसोबत फाईट सीन्समध्ये झळकली आहे. दोघींमध्ये तुर्कीतील हम्माममध्ये टॉवेल फाईट सीन शूट करण्यात आला. कतरिनासोबत या सीनमध्ये शूट करत असतानाचा अनुभव मिशेलनं शेअर केलाय.

मिशेल ली आणि कतरिा कैफ यांच्यातील टॉवेल फाईट सीक्वेन्स

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा सीक्वेन्स इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. याबाबत बोलताना मिशेल म्हणाली की 'टायगर 3' च्या ट्रेलरमधील टॉवेल फाईट सीन हिट ठरलाय यामध्ये तिला काहीही नवल वाटलं नाही. तिनं हा सीक्वेन्स शूट करण्यापूर्वी दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ कतरिनासोबत रिहर्सल केली होती.

ती म्हणाली, 'मला यात आश्चर्य वाटले नाही. जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो तेव्हा मला वाटलं होतं की ते खूपच महान घडतंय. आम्ही दोन आठवडे लढाई शिकलो आणि सराव केला आणि नंतर हा सीन शूट केला. सेटची रचना खूपच सुंदर होती आणि लढा खरोखरच मजेदार होता. आंतरराष्ट्रीय चित्रपटात असं दृष्य असणं खूप छान होतं.'

हा एपिक एक्शन सीक्वेन्स यशस्वी करण्यासाठी कतरिनाच्या समर्पणाचं मिशेलनं कौतुक केलंय. ती पुढे म्हणाली, 'या सीनसाठी कतरिना खूरच प्रोफेशनल होती. तिनं आपल्या हालचाली चपळ करण्यासाठी खरोखर कठोर परिश्रम केलं. तिला अशा फाईट सीन्सच्या कोरिओग्राफीचा चांगला अनुभव होता. तिच्यासोबत काम करणे खूप सोपे होते. यासाठी आम्ही खूप घाम गाळला!'

मिशलनं सांगितलं की शरीराव गुंडाळलेला टॉवेल ढळू नं देणं आणि त्याच वेळी दुसऱ्यावर हल्ला करणं हे हम्माम सीक्वेन्सच्या शूटिंगचे सर्वात मोठं आव्हान होतं. वेगवान हालचाली सुरू असताना टॉवेल विशिष्ट ठिकाणी बंद केल्यामुळे आम्ही दोघींनाही चांगली मदत मिळाली असल्याचंही मिशेलनं सांगितलं.

मिशेलने यापूर्वी 'ब्लॅक विडो' चित्रपटामध्ये स्कार्लेट जोहानसन, 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन'मध्ये जॉनी डेप, 'बुलेट ट्रेन'मध्ये ब्रॅड पिट आणि 'वेनम'मध्ये टॉम हार्डीसोबत काम केले आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' या चित्रपटात कतरिना व्यतिरिक्त सलमान खान आणि इमरान हाश्मी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. Tejas X Review : कंगनाच्या 'तेजस'ला थंड सुरुवात, बॉक्स ऑफिसवर अपेक्षेहून कमी प्रतिसाद

2.MAMI Film Festival 2023 : देसी गर्ल प्रियांका चोप्राचं मामी फेस्टीव्हलसाठी आगमन

3.Rhea Chakraborty : सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं व्हिडिओ पोस्ट करून शेअर केला तुरुंगातील अनुभव...

ABOUT THE AUTHOR

...view details