महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

शशी थरुर यांनी गायलेले हिंदी गाणे व्हायरल, जावेद अख्तर यांचे मिश्किल ट्विट - Shashi Tharoor Hindi Song

काँग्रेसचे नेते व खासदार शशी थरुर यांनी गायलेले हिंदी गाणे व्हायरल झाले आहे. माहिती तंत्रज्ञान संसदीय स्थायी समितीसाठी दूरदर्शन श्रीनगरच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांना गायनाची विनंती केली होती. यावेळी त्यांनी एक अजनबी हसीनां से एक मुलाखात हो गयी, हे गीत गायले.

शशी थरुर
शशी थरुर

By

Published : Sep 7, 2022, 11:57 AM IST

मुंबई - माहिती तंत्रज्ञान संसदीय स्थायी समितीसाठी दूरदर्शन श्रीनगरच्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर काँग्रेसचे नेते व खासदार शशी थरुर यांना हिंदी गाणे गाण्याची विनंती करण्यात आली. यावेळी त्यांनी अत्यंत भारदास्त आवाजात एक अजनबी हसीनां से एक मुलाखात हो गयी, हे गीत गायले. उपस्थित सर्वांनाच थरुर यांचे हे गायन कौशल्या खूप आवडले. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

शशी थरुर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, ''६ सप्टेंबर २०२१ माहिती तंत्रज्ञान संसदीय स्थायी समितीसाठी दूरदर्शन श्रीनगरच्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर, मला सदस्यांसाठी गायनास प्रवृत्त करण्यात आले. हौशी आणि सराव नसलेले असले तरी आनंद घ्या.!''

शशी थरुर यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. यातील एक कमेंट खूपच चर्चेत आहे ती म्हणजे प्रसिध्द गीतकार सलीम जावेद यांची. त्यांनी म्हटलंय की, "व्वा, असेच एक गाणे हिंदीमध्येदेखील आहे!!!"

हेही वाचा -Goodbye Trailer: रश्मिका मंदान्नाच्या बॉलीवूड पदार्पण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details