महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Maharashtra Shaheer : हिंदी मालिकांमधील अभिनेता अमित डोलावतचे महाराष्ट्र शाहीरमधून मराठीत पदार्पण!

जीवनाच्या प्रवासात योग्य गुरू लाभला, तर तो आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे शाहीर साबळे (Shahir Sabale) आणि त्यांचे गुरू साने गुरुजी (Sane Guruji). शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) या शाहिरांच्या जीवनपटामध्ये त्यांचे गुरु साने गुरुजी यांचीही व्यक्तिरेखा महत्त्वाची आहे आणि अमित डोलावत (Amit Dolawat) याने ती भूमिका साकारली आहे. (Amit Dolawats debut in Marathi)

Amit Dolawat
अमित डोलावत

By

Published : Dec 27, 2022, 11:32 AM IST

मुंबई :वेळोवेळी शाहिरांच्या जीवनात येऊन त्यांना दिशा देणारे आणि त्यांच्या आयुष्यातल्या अनेक महत्वाच्या घडामोडींना कारणीभूत असलेले साने गुरुजी (Sane Guruji) यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून प्रेक्षकांसमोर 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shaheer) मधील साने गुरुजींची पहिली झलक निर्मात्यांनी सादर केली आहे. शाहीर साबळे (Shahir Sabale) आणि साने गुरुजी या गुरु-शिष्यांच्या व्यक्तिरेखांच्या निमित्ताने या चित्रपटात एक आदर्श नाते उलगडणार आहे. (Amit Dolawats debut in Marathi)



आघाडीच्या कलाकारांना चित्रपटात स्थान दिले :अमित डोलावतच्या (Amit Dolawat) या भूमिकेबद्दल बोलताना चित्रपटाचा दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) म्हणाला, माझे आजोबा म्हणजे शाहिर साबळेंच्या आयुष्यात साने गुरुजींच्या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते त्यांचे गुरु होते आणि त्यांच्या आयुष्याला गुरुजींनी कलाटणी दिली होती. त्यांची भूमिका अमित साकारतो आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. तो हिंदीतील एक प्रतिभावान अभिनेता आहे. उत्तम निर्मिती मूल्यांसाठी आम्ही आघाडीच्या कलाकारांना चित्रपटात स्थान दिले असून अमितचा या चित्रपटातील समावेश हे त्याचेच एक ध्योतक आहे.



चित्रीकरण सुरु आहे : ‘महाराष्ट्र शाहीर’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे. या चित्रपटाची दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चित्रीकरणाला सुरुवात झाली. सध्या वाई, भोर, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी त्याचे चित्रीकरण सुरु आहे.



शाहिरांच्या जीवनावरील चित्रपट : या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा...’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहिरांच्या जीवनावरील हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रातील सिनेमागृहांत प्रदर्शित होत आहे.

अमित डोलावतच्या वर्कफ्रंटबद्दल :अमित डोलावत हा भारतीय टेलीव्हीजनवरील एक आघाडीचा कलाकार असून दिव्य दृष्टी, देव, इश्क सुभान अल्लाह, बडी दूर से आये है, आदी गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने मध्यवर्ती भूमिका केल्या आहेत. त्याने नुकतीच 'नवे लक्ष्य' या मालिकेत प्रमुख भूमिका केली होती. २००३ मध्ये त्याने ‘पिया का घर’मधून आपल्या करियरला सुरुवात केली. डोलावतचा जन्म राजस्थान येथील जयपूर येथे झाला असून त्याला लहानपणापासून नृत्य आणि अभिनयाची आवड आहे. त्याला त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘पिया का घर’मध्ये अभिनयाची संधी मिळाली. टेलीव्हीजन जगतात त्याला त्याच्या या पहिल्याच मालिकेने भरपूर लोकप्रियता मिळवून दिली. त्याला त्यानंतर अनेक टेलीव्हीजन मालिकांमध्ये संधी मिळाली. आत्तापर्यंत त्याने ५० हूनही अधिक टेलीव्हीजन मालिकांमध्ये काम केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details