कोची (केरळ): ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्याला फार चर्चेत आहे. 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आदेश देण्यास केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. सोशल मीडियावर या चित्रपटामुळे चर्चेला आता एक वादाला नवा विषय मिळाला असून अनेक नेटकरी या वादाला एक वेगलीच वळणं दिल्याचं सोशल मीडियावर दिसत आहे. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करतात या सत्यघटनेवर हा चित्रपट आधारित आहे.
काय आहे चित्रपटात? :या चित्रपटातील ट्रेलर हा समाजाच्या विरोधात आहे का, हे न्यायालयाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात आक्षेपार्ह काय होते? अल्लाह एकच देव आहे असे म्हणण्यात गैर काय आहे? देशाने नागरिकांना त्यांचा धर्म आणि देव मानून त्याचा प्रसार करण्याचा अधिकार दिला आहे. ट्रेलरमध्ये काय आक्षेपार्ह होते? चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर विचार न्यायालयाने निरीक्षण केले. यापूर्वी देखील अशा प्रकारचे अनेक चित्रपट आले आहेत. याआधीही अनेक चित्रपटांमध्ये हिंदू भिक्षू आणि ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विरोधात संदर्भ आले आहेत. हे सर्व तुम्ही काल्पनिक पद्धतीने पाहिले आहे का? आता यात विशेष काय आहे? हा चित्रपट सांप्रदायिकता कसा निर्माण करतो? आणि समाजात संघर्ष या द्वारे होईल हे न्यायालयाने निरीक्षण केले.
याचिकाकर्त्यांनी काय युक्तिवाद केला : या चित्रपटामुळे निष्पाप लोकांच्या मनात विष घुसवले जाईल, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की केरळमध्ये 'लव्ह जिहाद'चे अस्तित्व अद्याप कोणत्याही एजन्सीला सापडलेले नाही. न्यायमूर्ती एन नागेश आणि न्यायमूर्ती मोहम्मद नियास सीपी यांनी खंडपीठाने यावर विचार केला आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित, या चित्रपटाने आगामी चित्रपटावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रियांसह एक मोठा राजकीय वाद निर्माण केला आहे. 'द केरळ स्टोरी'मध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सेन यांच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आला कारण त्यात दावा केला होता की राज्यातील 32,000 मुलींचे धर्मांतर करण्यात आल्याचा दावा या चित्रपटाद्वारा करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.