मुंबई: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 च्या विजेत्यांची नावे गेल्या सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी रात्री जाहीर करण्यात आली. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मुंबईत आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये चित्रपट क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. दादासाहेब फाळके यांचा वारसा पुढे नेण्यासाठी दादा साहेब
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार : सोमवारी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावणाऱ्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटासाठी अनुपम खेर यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 'गंगूबाई काठियावाडी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवण्याबरोबरच आलिया भट्टने तिचा पती रणबीर कपूरच्यावतीने 'ब्रह्मास्त्र'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही स्वीकारला.
क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड :मोस्ट प्रॉमिसिंग ॲक्टरचा पुरस्कार अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीला त्याच्या कन्नड चित्रपट 'कंतारा'साठी देण्यात आला. 'भेडिया' मधील त्याच्या भूमिकेसाठी वरुण धवनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा क्रिटिक्स चॉईस अवॉर्डही मिळवला. रुपाली गांगुली अभिनीत 'अनुपमा' या टेलिव्हिजन मालिकेने या कार्यक्रमात टेलिव्हिजन मालिका ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावला. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना त्यांच्या 'चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट योगदानासाठी' मान्यता मिळाली. तिने या प्रसंगी सोनेरी साडी घातली होती आणि पांढरी साडी परिधान केलेल्या आलियाशी संवाद साधताना दिसली. त्यांनी चुंबन घेतले, मिठी मारली आणि पापाराझींसोबत फोटोसाठी पोझ दिली. लोकप्रिय गायक आणि संगीतकार हरिहरन यांना त्यांच्या 'संगीत उद्योगातील उत्कृष्ट योगदानासाठी' मान्यता मिळाली. फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (DPIFF) ची स्थापना 2012 मध्ये करण्यात आली. डीपीआयएफएफ वेबसाइटनुसार हा भारताचा एकमात्र स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. हा पुरस्कार केंद्र सरकारकडून देण्यात येणारा नाही. नावाच्या साधर्म्यामुळे अनेकांचा गोंधळ उडत असल्याचे दिसून येते.
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी :
- सर्वश्रेष्ठ फिल्म - द कश्मीर फाइल्स
- मूवी ऑफ द ईयर - आरआरआर
- सर्वश्रेष्ठ अभिनेता - रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र भाग एक: शिवा)
- सर्वश्रेष्ठ अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगूभाई काठियावाड़ी)
- क्रिटिक्स बेस्ट एक्टर- वरुण धवन (भेड़िया)
- क्रिटिक्स बेस्ट एक्ट्रेस - विद्या बालन
- सर्वश्रेष्ठ निर्देशक- आर बाल्की (चुप)
- बेस्ट सिनेमैटोग्राफर- पीएस विनोद (विक्रम वेधा)
- मोस्ट प्रॉमिसिंग एक्टर - ऋषभ शेट्टी (कांतारा)
- सहायक भूमिका में सर्वश्रेष्ठ अभिनेता - मनीष पॉल (जुग-जुग जियो)
- सर्वश्रेष्ठ पार्श्व गायक (पुरुष)- सचेत टंडन - मैय्या मैनू
- सर्वश्रेष्ठ पार्श्व गायिका (महिला) - नीति मोहन (मेरी जान- गंगूभाई काठियावाड़ी)
- सर्वश्रेष्ठ वेब सीरीज – रुद्र: द एज ऑफ डार्कनेस (हिंदी)
- मोस्ट वर्सेटाइल एक्टर- अनुपम खेर (द कश्मीर फाइल्स)
- टेलीविजन सीरीज ऑफ द ईयर - अनुपमा जैन
- बेस्ट एक्टर इन टीवी सीरीज - इमाम - (इश्क में मरजावां)
- सर्वश्रेष्ठ अभिनेत्री (टीवी) - तेजस्वी प्रकाश (नागिन)
- फिल्म उद्योगतील उत्कृष्ट योगदानाकरिता दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव पुरस्कार 2023: रेखा
- संगीत उद्योगातील उत्कृष्ट योगदानाकरिता दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव पुरस्कार 2023: हरिहरन
हेही वाचा :Shoaib Akhtar Bollywood : मला बॉलीवूड चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर आली होती शोएब अख्तर