मुंबई- तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आर माधवनचा अभिनय प्रवास खास राहिला आहे. एक अभिनेता म्हणून त्याने अष्टपैलुत्व दाखवत विविध प्रकारच्या व्यक्तीरेखा पडद्यावर साकारल्या आहेत. अलिकडेच त्याने दिग्दर्शित केलेला आणि भूमिकाही साकारलेला रॉकेट्री चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटातून त्याने एक बहुप्रतिभावान अभिनेता म्हणून स्वतःचे स्थान भक्कम केले. १ जून रोजी तो ५३ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्यामुळे त्याच्या वाढदिवसानिमित्य अष्टपैलुत्वावर एक नजर टाकूयात.
रेहना है तेरे दिल में
'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटामधील मॅडीच्या भूमिकेमुळे त्याने कायमची छाप सोडली आणि प्रेक्षकांना त्याच्या पात्राच्या प्रेमात पाडले. मॅडीची सुरुवात एक निश्चिंत आणि खोडकर महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून होते, परंतु दिया मिर्झाची भूमिका साकारलेल्या रीना मल्होत्राच्या प्रेमात पडल्यावर त्याच्या आयुष्यात एक वळण येते. माधवनच्या ब्रॅटच्या बाजूकडून मॅडीच्या पात्राच्या रोमँटिक बाजूकडे बदल झाल्यामुळे प्रेक्षक त्यांच्या प्रेमकथेत भावनिक गुंतवले गेले. सच कह रहा है हे गाणे भावनिक गडबड सुंदरपणे टिपते. माधवनच्या चॉकलेट बॉय इमेजमुळे त्याचे पात्र जीवंत झाले. त्याचा हा एक हृदयस्पर्शी चित्रपट ठरला होता.
तन्नू वेड्स मन्नू
या रोमँटिक-कॉमेडी नाट्यमय चित्रपटात माधवनने मनूच्या भूमिकेत अनिवासी भारतीय डॉक्टरचा उत्कृष्ट अभिनय सादर केला. प्रेमाच्या त्रिकोणात अडकलेल्या एका साध्या, सौम्य स्वभावाच्या डॉक्टरच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. माधवनने ही व्यक्तिरेखा सहज आणि प्रामाणिकपणाने जिवंत केली. मनूच्या भावना आणि अनुभवांचे बारकावे चित्रित करण्यात त्याच्या प्रामाणिकपणाने आणि कठोर परिश्रमाचे फळ मिळाले, कारण चाहते त्या पात्राकडे आकर्षित झाले आणि त्याच्या प्रेमात पडले. तनुची भूमिका साकारणारी माधवन आणि कंगना राणौत यांच्यातील केमिस्ट्रीचेही खूप कौतुक झाले. त्यांची ऑन-स्क्रीन जोडी आणि त्यांच्या नात्यातील गतिमानता यामुळे कथेत अधिक खोलवर भर पडली. मनूचे अखंड प्रेम आणि अंतर्गत संघर्ष व्यक्त करण्याची माधवनची क्षमता या चित्रपटांच्या यशात कारणीभूत ठरले.
थ्री एडियट
या ब्लॉकबस्टर कॉमेडी-ड्रामामध्ये माधवनने भूमिका केलेली फरहान कुरेशी हा रॅंचो (आमिर खान) आणि राजू (शरमन जोशी) यांच्यासोबत चित्रपटातील तीन मुख्य नायकांपैकी एक आहे. फरहान कुरेशीचे पात्र एक प्रतिभावान आणि उत्कट महत्त्वाकांक्षी छायाचित्रकार म्हणून दाखवले गेले. घरच्या बदाबावामुळे तो आपली खरी आवड बाजूला ठेवून इंडिनिअरिंगचे शिक्षण घेत असतो. आयुष्यात खरी आवड शोधणे आणि लादलेल्या अपेक्षांना नकार देणे किती आवश्यक आहे यावर चित्रपटात भाष्य करण्यात आले होते.