मुंबई :आयुष्मान खुराना अभिनीत 'ड्रीम गर्ल 2' सध्या कितीही चर्चेत असला तरी ओरिजिनल 'ड्रीम गर्ल' म्हणजे हेमा मालिनी जेव्हा मैदानात उतरते, तेव्हा अनेकांची बोलती बंद होऊन जाते.'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले आहेत. मात्र आताही या चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची चर्चा सुरूच आहे. धर्मेंद्र यांनी वयाच्या ८७व्या वर्षी शबाना आझमीसोबत हा सीन करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम लाभलं. तसंच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चं समीक्षकांनीही कौतुक केलं. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची केमिस्ट्री जबरदस्त होती. पण धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान आता हेमा मालिनी यांनीही या किसिंग सीनवर आपली प्रतिक्रिया दिली.
हेमा मालिनी मोठ्या पडद्यावर झळकणार : नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांना विचारण्यात आलं की, त्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट पाहिला आहे का? ज्यावर हेमा यांनी उत्तर दिलं, 'हा चित्रपट अजूनही पाहिला नाही'. यानंतर हेमा यांना विचारण्यात आलं की, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये धर्मेंद्रची भूमिका त्यांना दिली गेली असती तर त्यांनी स्वीकारली असती का? यावर 'शोले'तल्या बसंतीच्या स्टाईलमध्ये हेमा मालिनी यांनी उत्तर दिलं, 'हो नक्कीच स्वीकारली असती. जर ते चांगलं असेल किंवा चित्रपटाशी संबंधित असेल आणि चित्रपटाशी जुळत असेल तर कदाचित मी ते करेन'.