महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Hema Malini : 'गदर २' चित्रपट कसा वाटला, सनी देओलच्या सावत्र आईने 'ही' दिली प्रतिक्रिया - हेमा मालिनीने केले सनी देओलचे कौतुक

हेमा मालिनी यांनी सनी देओलचा चित्रपट 'गदर २' पाहिला. काल रात्री पापाराझीने हेमा यांना मुंबईतील एका थिएटरबाहेर स्पॉट केले, त्यानंतर हेमा मालिनी यांनी 'गदर २'बद्दल कौतुक केले आहे.

Gadar 2
गदर २

By

Published : Aug 20, 2023, 11:51 AM IST

मुंबई : 'गदर २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. या चित्रपटाने ९ दिवसांत ३३६.१३ कोटी रुपये कमवले आहेत. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण या चित्रपटाचे कौतुक करताना थकत नाहीत. त्याचबरोबर सनी देओलची सावत्र आई म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही 'गदर २'ची प्रशंसा केली आहे. हेमा मालिनी यांनी शनिवारी 'गदर २' चित्रपट पाहिला आणि थिएटरमधून बाहेर पडून पापाराझींशी संवाद साधला. यावेळी हेमा मालिनी यांनी 'गदर २'बाबत आपली प्रतिक्रिया दिली. हेमा मालिनी यांनी हा चित्रपट मनोरंजक असल्याचे म्हटले. या चित्रपटात भारत आणि पाकिस्तानसाठी चांगला संदेश असल्याचे सांगितले. हा चित्रपट रूपेरी पडद्यावर जोरदार कमाई करत आहे.

  • हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया : पापाराझींशी बोलताना हेमा मालिनी यांनी म्हटले, 'गदर २ पाहिल्यानंतर खूप छान वाटले. हा चित्रपट अपेक्षेप्रमाणेच अतिशय मनोरंजक होता. पुढे त्यांनी म्हटले की, हा चित्रपट ७० ते ८० च्या दशकातील चित्रपट वाटत होता. या चित्रपटात त्यांनी हे युग आणले आहे. अनिल शर्मा यांनी खूप सुंदर दिग्दर्शन केले आहे.

सनी देओलचे केले कौतुक : हेमा मालिनी यांनी त्यांचा सावत्र मुलगा सनी देओलचेही खूप कौतुक केले. 'गदर २' मधील सनीच्या भूमिकेसाठी त्यांनी त्याला 'फॅब्युलस' असे म्हटले. याशिवाय उत्कर्ष शर्माच्या अभिनयाचेही कौतुक केले. सिमरत कौरबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की , 'नवीन मुलगीही खूप चांगली आहे.' असे पापाराझींशी बोलताना हेमा मालिनी यांनी सांगितले.

सनी देओलच्या कुटुंबापासून दूर राहते हेमा! :हेमा मालिनी या धर्मेंद्र यांची दुसऱ्या पत्नी आहेत. त्यामुळे त्या सावत्र मुलगा सनी देओल आणि बॉबी देओलपासून दूर राहतात. आता नुकतेच सनी देओलचा मुलगा करण देओलचे लग्न झाले. हेमा मालिनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या नव्हत्या. याशिवाय त्यांच्या मुलीही सनी देओलच्या कुटुंबापासून दूर राहतात. आता काही दिवसांपूर्वी ईशा देओल, सनी देओल आणि बॉबी देओल एकत्र दिसले होते. ही भावंडे पहिल्यांदाच एकत्र दिसली.

हेही वाचा :

  1. GADAR 2 VS PATHAAN : 'गदर २' आणि 'पठाण'चे पहिल्या आठवड्यातील कलेक्शन; 'तारा सिंह' रेकॉर्ड मोडू शकेल?
  2. Kangana Ranaut : रणौतने केली सनी देओलची पाठराखण, वाचा व्हिडिओवर काय दिली प्रतिक्रिया...
  3. Vijay Varma and Tamannaah bhatia : विजय वर्माने तमन्ना भाटियासोबतच्या नात्यावर केला खुलासा...

ABOUT THE AUTHOR

...view details