मुंबई - Fighter next song :अभिनेता हृतिक रोशनच्या आगामी 'फायटर' चित्रपटातील 'हीर आसमानी' या नव्या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'शेर खुल गए' आणि 'इश्क जैसा कुछ'नंतर चाहते या गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'फायटर'चं हे गाणं 8 जानेवारीला रिलीज होणार आहे. हृतिक रोशनच्या एरियल अॅक्शन चित्रपट हा थोडा हटके असणार आहे. 'हीर आसमानी' या गाण्यात दीपिका आणि हृतिकची जादू पाहायला मिळत आहे. हा चित्रपट देशाच्या सुरक्षेमध्ये गुंतलेल्या लढाऊ वैमानिकांना समर्पित आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण अनिल कपूर यांसारखे स्टार्स मुख्य भूमिकेत आहेत.
'फायटर' चित्रपटामधील गाणं : हृतिक रोशननं त्याच्या सोशल मीडिया हँडलवर 'हीर आसमानी'चा टीझर शेअर केला आहे. या गाण्याचे पार्श्वसंगीत हे दमदार असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय या गाण्यात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण एअरफोर्सच्या गणवेशात दाखवण्यात आले आहेत. 'स्काय इज द लिमिट' असे गाण्याच्या टीझरमध्ये लिहिले आहे. या गाण्यामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांच्या मैत्रीची झलक पाहायला मिळते. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, संजीदा शेख हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. टीझर रिलीज करण्यासोबतच हृतिकनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''जमीन वालों को नजर नहीं आनी, मेरी हीर आसमानी. हे गाणे 8 जानेवारीला रिलीज होणार आहे.''