महाराष्ट्र

maharashtra

पहिला चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतरही तमन्ना भाटिया आहे साऊथ आणि बॉलिवूडची टॉप अभिनेत्री

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 5:35 PM IST

Happy Birthday Tamannaah Bhatia: तमन्ना भाटिया आज तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. ती साऊथ आणि बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी असून तिचा डेब्यू चित्रपट फ्लॉप ठरला होता.

Happy Birthday Tamannaah Bhatia
वाढदिवसाच्या शुभेच्छा तमन्ना भाटिया

मुंबई - Happy Birthday Tamannaah Bhatia:साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटिया आज 21 डिसेंबर रोजी तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. तमन्नाचा डेब्यू चित्रपट फ्लॉप झाला होता, पण आज ती साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार तमन्नाची एकूण संपत्ती 120 कोटी असून तिनं आपल्या 18 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत जवळपास 67 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तमन्नानं तिच्या अभिनयची सुरूवात 'चांद सा रोशन चेहरा' या हिंदी चित्रपटातून केली. 2005 मध्ये रिलीज झालेला, तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. यानंतर ती साऊथ इंडस्ट्रीकडे वळली.

तमन्ना भाटियाची चित्रपट कारकिर्दी :तमन्ना भाटिया 2005 रोजी तेलुगू चित्रपट 'श्री'मध्ये दिसली. यानंतर तिनं तामिळ चित्रपट 'केडी'मध्ये काम केलं. तमन्नाला खरी ओळख 2007 रोजी प्रदर्शित झालेला तेलुगू चित्रपट 'हैप्पी डेज'मधून मिळाली. यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिले नाही. काही काळातच तमन्ना साऊथमध्ये एक प्रसिद्ध नाव बनली. 2013 मध्ये, तिनं 'हिम्मतवाला' या हिंदी चित्रपटाद्वारे पुनरागमन केलं, ज्यामध्ये ती अजय देवगणसोबत दिसली होती. तमन्ना अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच पूर्वी क्रिकेटपटू विराट कोहलीशीही जोडले गेलं होत. दरम्यान ती अभिनेता विजय वर्माला डेट करत आहे. हे जोडपे अनेकदा एकत्र दिसतात.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच नात :तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा नुकताच 'लस्ट स्टोरीज 2' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान त्याच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. यानंतर एका मुलाखतीत तमन्नानं तिच्या नात्यावर खुलासा करत तिच्या प्रेमाची कबुली दिली. तमन्ना तिच्या चित्रपटांसाठी 4-5 कोटी रुपये मानधन घेते. तिचा 'बाहुबली' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटासाठी तिनं 5 कोटी रुपये घेतलं होतं. नुकतीच तमन्ना रजनीकांत यांच्या 'जेलर' चित्रपटात दिसली होती. आता ती 'दॅट इज महालक्ष्मी', 'कथु करुप्पु', 'अरमानाई 4' आणि 'येन इंद्रु काधळ एनबेन' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. राजकुमार हिराणी यांचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
  2. 'सालार'चित्रपटाच्या कथानकाला पुढे घेऊन जाणारं दुसरं गाणं 'किस्सों में' रिलीज
  3. सलमान खानचा भाऊ अरबाज खान पुन्हा एकदा करणार लग्न, कोण आहे ती 'मिस्ट्री गर्ल' ?

ABOUT THE AUTHOR

...view details