महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

HBD Saira Banu सायरा बानोंनी रंगवलेली अजरामर पात्रे - HBD Saira Banu

60 आणि 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांचा आज 78 वा वाढदिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही अप्रतिम पात्रांवर एक नजर टाकूया.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Aug 23, 2022, 4:20 PM IST

मुंबईदिल विल प्यार व्यार में क्या जानून रे... हे गाणे आठवताच डोळ्यासमोर येते ती सौंदर्य आणि निरागसतेने परिपूर्ण असलेल्या सायरा बानोंची सुंदर मुर्ती. आज त्यांचा ७८ वा वाढदिवस आहे. 23 ऑगस्ट 1944 रोजी उत्तराखंडमधील मसुरी येथे जन्मलेल्या या 60 आणि 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीने 'शागिर्द' चित्रपटात एका साध्या खेड्यातील मुलीची आणि पूरब और पश्चिम या चित्रपटात परदेशातील एका आधुनिक साहसी मुलीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही अप्रतिम पात्रांवर एक नजर टाकूया...

जंगली 1961 सुबोध मुखर्जी निर्मित आणि दिग्दर्शित या चित्रपटाला शंकर-जयकिशन यांचे संगीत आणि शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांचे गीते लाभली होती. या चित्रपटात शम्मी कपूर, ललिता पवार, शशिकला, अनूप कुमार आणि असित सेन यांच्या भूमिका आहेत. सायरा बानोंच्या पहिल्या चित्रपटाने त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर नामांकन मिळवून दिला होता.

शागिर्द 1967 समीर गांगुली दिग्दर्शित या विनोदी हिंदी चित्रपटात जॉय मुखर्जी आणि सायरा बानो यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात जॉय मुखर्जी शहरी मुलाच्या भूमिकेत होता, तर शायरा बानो गावातील एका भोळ्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती.

पडोसन हा 1968मध्ये बनलेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात सायरा बानोसोबत सुनील दत्त मुख्य भूमिकेत होते. या मजेदार कॉमेडी चित्रपटात सुनील दत्तच्या पात्राचे नाव भोला आणि सायरा बानोच्या पात्राचे नाव बिंदू होते. यासोबतच किशोर कुमारनेही या चित्रपटात विद्यापती/गुरुजींची भूमिका साकारली होती. याशिवाय मेहमूद, ओमप्रकाश, आगा वगैरेही चित्रपटात होते.

पूरब और पश्चिम 1970 उपकार या हिंदी चित्रपटानंतर मनोज कुमारचा भारत कुमार म्हणून हा दुसरा चित्रपट होता, ज्यामध्ये विनोद खन्ना, अशोक कुमार, सायरा बानोसोबत होते. ओम प्रकाश, प्रेमचोप्रा इ. कलाकार असलेल्या या चित्रपटात सायरा बानोने परदेशात वाढलेल्या मुलीची भूमिका साकारली होती.

गोपी 1970 गोपी हा 1970 च्या दशकात बनलेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटातील सायरा बानोच्या पात्राचे नाव सीमा होते आणि तिच्यासोबत दिलीप कुमार, प्राण, जॉनी वॉकर, सुदेश कुमार, निरुपा रॉय, फरीदा जलाल, ललिता पवार, दुर्गा खोटे, अरुणा रॉय यांसारखे दमदार कलाकार होते.

हेही वाचा -Kk Birth Anniversary गायक केकेच्या जन्मदिनी मुलगी तमाराने लिहिली भावनिक पोस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details