मुंबई - Farhan Akhtar birthday :हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तरनं 9 जानेवारी रोजी आपला 50वा वाढदिवस साजरा केला. घरी साजरा करण्यात आलेल्या त्याच्या वाढदिवसाला शबाना आझमी, जावेद अख्तर, हनी इराणी, शिबानी दांडेकर आणि इतर कुटुंबीय हजर होते. दरम्यान त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शबाना आझमीनं शेअर करत एक खास पोस्ट त्याच्यासाठी लिहिली आहे. या पोस्टवर तिनं लिहिलं, ''हॅपी एनिवर्सरी बेटू फरहान, दीर्घायुष्य जग आणि आनंदी रहा, भरपूर प्रेम.'' ही पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच गायिका आणि अभिनेत्री इला अरुणनं 'हॅपी बर्थडे फरहान'अशी कमेंट केली.
फरहान अख्तरचा वाढदिवस :शबाना आझमीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, फरहान तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असाचं आनंदी राहा.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, फरहान तू जबरदस्त आहे हे तुला माहित आहे, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.'' आणखी एकानं लिहिलं, वाढदिवसाच्या शुभेच्छा तू खूप हुशार व्यक्ती आहे हे सर्वांना माहित आहे, असाच प्रगती करत राहा.'' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.