लिव्हरपूल ( यूके ) - ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि तिचा गायक पती निक जोनास लिव्हरपूलमध्ये कुटुंबासह आनंद घेत आहेत. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवर नवरा, मुलगी मालती, आई मधु चोप्रा आणि तिच्या सासऱ्यांसोबतचे अलीकडील प्रवासातील काही फोटो शेअर केले.
फोटोमध्ये असे दिसतंय की प्रत्येकजण मजा करत आहे. फोटोंच्या मालिकेत प्रियांकाने तिच्या संपूर्ण प्रवासाची आणि ट्रेनच्या प्रवासाची झलक शेअर केली आहे. तिने पोस्ट केलेल्या पहिल्या इमेजमध्ये प्रियांका तिचा पती निकच्या शेजारी बसलेली दिसत आहे. बोट क्रूझवर असताना निकने त्यांचा फोटो काढला असून प्रियांकाने यावेळी कॅप घातलेली आहे.
आणखी एका फोटोत प्रियांका तिची मैत्रिण तमन्ना दत्तच्या शेजारी उभी आहे. प्रियांका आणि निक यांची मुलगी मालती मेरी, तिसर्या फोटोमध्ये एका छोट्या पांढऱ्या खुर्चीवर बसलेली असून हिरवी पर्स उघडताना दिसत आहे. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये छोटी मावती सुंदर दिसत आहे.
प्रियांकाने एक फोटो देखील शेअर केला आहे ज्यात निक व दोघांचेही कुटुंबीय कुटुंब स्टेशनवर दिसत आहे. निक सूटकेस घेऊन जाताना दिसत आहे तर प्रियंका मालतीला धरून आहे. पुढील फोटोत प्रियांका मालतीला ट्रेनच्या खिडकीबाहेरचे सुंदर दृश्य दाखवताना दिसत आहे. इतर दोन फोटोंमध्ये मालती ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पाहत आहे आणि दुसऱ्या मुलासोबत प्रवासाचा आनंद घेत आहे.
मालती दुसर्या फोटोत एका छोट्या तलावात मजा करताना दिसत आहे आणि पुढच्या फोटोत ती तिचे वडील निकचा हात धरून कारकडे चालतांना दिसते. प्रियांकाची आई मधू चोप्रा आणि तिची सासू डेनिस जोनास हसताना आणि एकत्र पोज देताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना प्रियांकाने कॅप्शनमध्ये, 'जादुई कुटुंबीय' असे लिहिलंय.