महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

डेव्हिड बेकहॅमसोबतच्या फोटोवरुन खिल्ली उडवणाऱ्या हर्षवर्धन कपूरनं दिलं शांत उत्तर - फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम

Harsh Varrdhan Kapoor harsh replies to troll : अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरनं फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यावर काही युजर्सनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावर थोड्याशा मिश्किल आणि कडक शब्दातही त्यानं सडेतोड उत्तर दिलंय.

Harshvardhan Kapoor with David Beckham
डेव्हिड बेकहॅमसोबत हर्षवर्धन कपूर

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 17, 2023, 3:11 PM IST

मुंबई- Harsh Varrdhan Kapoor harsh replies to troll : बॉलिवूड स्टार अनिल कपूरचा मुलगा अभिनेता हर्षवर्धन कपूरनं अलीकडेच प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमसोबत पोझ देतानाचा एक फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हर्षवर्धनची बहिण सोनम कपूरनं फुटबॉलपटू बेकहॅमसाठी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी अनेक सेलेब्रिटी हजर होते. त्यावेळी हर्षवर्धननं बेकहॅमसोबत फोटो क्लिक केला होता.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम पाहुणा म्हणून मैदानावर हजर होता. त्यानंतर बुधवारी रात्री डेव्हिड बेकहॅमच्या सन्मानार्थ सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी आयोजित केलेल्या पार्टीत हर्षवर्धन कपूर पाहुण्यांपैकी एक होता. कार्यक्रमादरम्यान अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते आणि त्यांनी बेकहॅमसोबतचे फोटो पोस्ट केले होते. अर्थातच हर्षही त्याला अपवाद नव्हता. हर्षवर्धनने डेव्हिड बेकहॅमसोबतचा त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर एका युजरनं हर्षवर्धनच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन उपहासात्मक कमेंट केली.

हर्षवर्धन कपूरनं मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर डेव्हिड बेकहॅमसोबतचा एक फोटो पोस्ट केला. कॅप्शनमध्ये, त्यानं फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडबद्दल त्यांच्यात झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला होता. या पोस्टनंतर, दुसर्‍या सोशल मीडिया युजर्सने हर्षच्या इंडस्ट्रीतील अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करत त्याची खिल्ली उडवली. हर्षने उत्तर देताना म्हटलं की, बेकहॅमने त्याच्या घरी भेट दिली आणि युजरलाच त्यांच्या स्वतःच्या ओळखीबद्दल मनोरंजकपणे विचारलं.

या दरम्यान एका युजरनं बनावट स्नीकर्सचा पूर्वीचा वाद उकरुन काढला आणि बेकहॅमने अस्सल स्नीकर्स घातले होते का याची चौकशी केली. हर्षने गंमतीने उत्तर दिले की बेकहॅमनेही बनावट कपडे घातले होते, विनोदाने सुचवले की दोघांनी एकाच दुकानात खरेदी केली होती. सोशल मीडियावरील निगेटिव्ह कमेट्सबाबत हर्षवर्धन म्हणाला की तो कोणालाही न डिवचता स्वतःच काम करतो पण त्याच्या वाट्याला गेल्यास त्याचा समाचार घेण्यास तो मागे हटत नाही.

नकारात्मकतेला संबोधित करताना, हर्षवर्धन कपूरने पुन्हा पोस्ट केले, असे ठासून सांगितले की तो चिथावणी न देता स्वतःचे काम करतो, परंतु सोशल मीडियावर त्याच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यास तो मागेपुढे पाहणार नाही.

चित्रपटाच्या आघाडीवर हर्षवर्धन कपूरनं थार या चित्रपटात अखेरची भूमिका केली होती. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राच्या आगामी बायोपिकमध्ये तो आता काम करणार आहे.

हेही वाचा -

  1. रश्मिका मंदान्ना डीपफेक वादानंतर केंद्र सरकार गंभीर, सोशल मीडिया दिग्गजांना चर्चेसाठी आमंत्रण

2.कृष्णा श्रॉफसोबत आकर्षक फॅशनसह कॅमेऱ्यात कैद झाली दिशा पटानी

3.सोनम कपूरच्या पार्टीत डेव्हिड बेकहॅम, किंग खानच्या मन्नत बंगल्यातही लावली हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details