मुंबई - भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग आणि त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसरा यांचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. खरंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर एक रील पोस्ट केले आहे. या व्हिडिओतील आशय पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हास्य फुलल्या शिवाय राहणार नाही.
हरभजनने पोस्ट केलेला व्हिडिओ हिंदीमध्ये आहे. तो आपली पत्नी गीता बसरासोबत रोमँटिक गप्पा मारताना दिसतो. हरभजन म्हणतो, ''आपल्या लग्नाला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत... यावर त्याची गीता बासरा पत्नी लाजते व म्हणते हां जी..हरभजन म्हणतो: मी हे विचारतो होतो की दुसऱ्यांदा निवडणूका होणार की हेच सरकार पुढे सुरू ठेवायचे.'' त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "मेरी सरकार. शादी के साईड इफेक्ट्स पार्ट ३."