मुंबई - सर्व अर्थाने कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून बॉलिवूड सेलेब्रिटींमध्ये शाहिद कपूरला ओळखले जाते. निरोगी कौटुंबिक जीवन टिकवून ठेवल्याने शाहिदची सार्वजनिक प्रतिमा उजळ आहे. तो एक प्रेमळ पती, कर्तव्यदक्ष मुलगा, खर्या अर्थाने मोठा भाऊ आणि प्रेमळ पिता आहे. सर्व भूमिका सुंदरपणे साकारणे हे सोपे काम नाही, विशेषत: बॉलिवूड सेलेब्रिटींसाठी हे खूप कठीण आहे. पण शाहिद कपूर त्याच्या कामाचा आणि वैयक्तिक जागेचा समतोल साधत असल्याने यावर मात करु शकतो. शाहिद आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्या काही कुटुंबासोबतच्या फोटोंसह त्याला शुभेच्छा देऊयात.
शाहिद आणि मीरा हे बॉलिवूडमधील सर्वात प्रेमळ जोडपे आहेत. त्यांनी 2015 मध्ये गाठ बांधली. शाहिद मीराच्या प्रेमपाशात गुंडाळलेला सतत दिसतो. कुठलीही पार्टी असो हे लव्हबर्ड्स तिथे सर्वांचे लक्ष वेधत असतात.
शाहिद आणि पंकज कपूर
शाहीदचे वडील पंकज कपूर यांच्यासोबत खूप चांगले नाते आहे. त्यांच्या 'जर्सी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याने वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला होता आणि त्याला कॅप्शन दिले होते, 'पापा के साथ काम करना मुश्कील नहीं डरावना है.'
शाहिद आणि नीलिमा अजीम
शाहिदचे त्याची आई नीलिमा यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत. कौटुंबिक प्रसंगी ते अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात.
शाहिद आणि ईशान खट्टर