मुंबई - Alia Bhatt's Sister Birthday : अभिनेत्री आलिया भट्टसाठी आज 28 नोव्हेंबर हा दिवस खूप खास आहे. या दिवशी तिची मोठी बहीण शाहीन भट्ट 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. खास प्रसंगी शाहीन भट्टनं रणबीर कपूर, बहीण आलिया आणि कुटुंबासह काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. दरम्यान या पोस्टवर अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याशिवाय आलिया भट्टनं बहीण शाहीन भट्टला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलियानं बहिणीसोबतचे चार फोटो शेअर केले आहेत , ज्यामध्ये एक बालपणीचा फोटो आहे. हा फोटो शेअर करून तिनं बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
आलिया भट्टनं शेअर केले :आलियानं शेअर केलेल्या पोस्टवर अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत आणि ते शाहीन भट्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आलिया भट्टची मोठी बहीण शाहीन चित्रपटांच्या चकचकीत दुनियेपासून दूर आहे, परंतु सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. आलियानं शेअर केलेल्या पोस्टवर कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तू आनंददायी आहोस..तू प्रकाश आहेस....प्रत्येक आता आणि नंतर आपण भांडतही राहू...तू सुर्य किरणं आहेस, तू वाऱ्याची झुळूक आहेस...तू तुझ्या गुडघ्यांची काळजी घे...मी लेखकही नाही मी कविही नाही...मी केवळ तुझ्यावर प्रेम करणारी बहिण आहे आणि मला खात्री आहे की ते तुला माहित आहे., अशा आशयाची कविता तिनं शेअर केली आहे. आलियानं शेअर केलेल्या बालपणीच्या फोटोमध्ये शाहीन बहीण आलियाच्या केसांना विंचरताना दिसत आहे. तर बाकीच्या फोटोत त्यांची खोडकर शैली दिसत आहे.