मुंबई : बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर 26 जून रोजी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी चाहत्यांसह सेलेब्स देखील अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अर्जुन कपूरला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा आल्या आहेत आणि ही खास शुभेच्छा दुसरी कोठूनही नसून अभिनेत्री मलायका अरोराकडून आली आहे. मलायकाने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या गोड बॉयफ्रेंडवर खूप प्रेमाचा वर्षाव केला आहे. मलायकाने सोशल मीडियावर एका सुंदर पोस्टद्वारे अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलायकाने या बर्थडे पोस्टमध्ये अर्जुन कपूरचे खोडकर फोटोही शेअर केले आहेत.
अर्जुन कपूर वाढदिवस :मलायकाने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहले, 'हॅपी बर्थडे माय सनशाईन, माय थिंकर, माय मूफी, माय शॉपहोलिक, माय हँडसम... अर्जुन कपूर'. मलायकाने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरचे पाच फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अर्जुच्या वेगवेगळ्या स्टाइलमध्ये दिसत आहेत. पहिल्या फोटोत अर्जुन सनग्लासेसमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या फोटत तो तलावाच्या काठावर उभा आहे. तिसऱ्या फोटोत अर्जुन कपूर शर्टलेस दिसत आहे. चौथ्या फोटोत तो छत्री धरून उभा आहे आणि पाचव्या फोटोत तो डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. तिच्या कॅप्शननुसार मलायकाने अर्जुनचे हे वेगळे फोटो शेअर केल्याचे दिसते.