मुंबई - Saif Kareena Wedding Anniversary: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक, अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर आज 16 ऑक्टोबर रोजी त्यांच्या लग्नाचा 11वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरम्यान आता या खास दिवशी त्यांचे मित्र आणि कुटुंबीय त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. करीना कपूर खाननं इन्स्टाग्रामवर पती सैफ अली खानसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सैफ कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहे. तर दुसरीकडे करीना पिझ्झा खाताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिनं एक सुंदर कॅप्शन दिलं आहे.
करीना कपूरनं शेअर केली पोस्ट : करीना कॅप्शनमध्ये लिहलं, 'हे तुझे आहे. तू , मी आणि पिझ्झा. सदैव प्रेम... हॅपी एनिवर्सरी.' या पोस्टवर सोहा अली खान, तारा शर्मा, मलायका अरोरा, संजय कपूर आणि त्याची पत्नी महीप कपूर यांनीही या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये करीना कपूर आणि सैफ यांच्यातील केमेस्ट्री स्पष्ट दिसत आहे. करीना अनेकदा कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. अनेकदा ती आपल्या चाहत्यांसोबत तिच्या चित्रपटाबद्दल अपटेडस शेअर करत असते. सध्या ती 'सिंघम 3' या मल्टीस्टारर चित्रपटामुळे चर्चेत आहे.