महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Happy 3 soulmate: प्रतीक बब्बरने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत साजरी केली उत्कठ प्रेमाची ३ वर्षे - प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जी तिसरी अ‍ॅनवरसरी

अभिनेता प्रतीक बब्बर आणि त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जी गेल्या तीन वर्षापासून एकत्र आहेत. आजच्याच दिवशी ते एकत्र आल्यामुळे ते हा दिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी प्रियाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघे एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

Prateik Babbar
प्रतीक बब्बर

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 3:23 PM IST

मुंबई : प्रतीक बब्बर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो सध्या त्याची गर्लफ्रेंड प्रिया बनर्जीसोबत आपल्या प्रेमाचा दिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी प्रियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रिया आणि प्रतीकची खास बाँडिंग पाहायला मिळत आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांना किस करत आहे. तसेच व्हिडिओत दोघांच्या आनंदी प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ देखील यामध्ये दिसत आहे. दरम्यान आता या पोस्टवर प्रतीकचे चाहते दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहे.

प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जीचे नाते : राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरने 2020 मध्ये प्रियासोबतचे नाते अधिकृत केले. दोघांनी एकत्र 3 वर्षे पूर्ण केली आहेत. या खास प्रसंगी प्रियाने फोटोसह आणि क्लिप शेअर केल्या आहेत. या व्हिडिओ क्लिपमध्ये एपी ढिल्लनच्या गाण्यासोबत प्रतीक आणि प्रियाची खास बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला गुलाबाच्या पाकळ्या दाखविण्यात आल्या आहेत. त्यानंतर या जोडप्यांनी एकत्र घालविलेले काही खास क्षण दिसत आहे. व्हिडिओमध्ये अनेकदा दोघे एकमेकांना किस करत आहे.

चाहत्यांनी पोस्टवर केल्या कमेंट : हा व्हिडिओ पाहून चाहते प्रतीक आणि प्रियाला शुभेच्छा देत आहेत. याशिवाय प्रतीकने देखील आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये प्रिया ही खूप आनंदी दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओ हा केकचा आहे. याआधी प्रतीक आणि प्रियानेही एकमेकांच्या हातावर टॅटू काढले होते. सोशल मीडियावर प्रिया आणि प्रतीक खूप सक्रिय राहतात. त्यामुळे अनेकदा हे कपल त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. प्रतीकने 2019 मध्ये सान्या सागरशी लग्न केले होते. त्यानंतर प्रिया बॅनर्जीसोबतच्या नात्याच्या बातम्या येऊ लागल्या. प्रतीकने 2020 मध्ये सान्याला घटस्फोट दिला होता आणि 2020 मध्येच प्रियासोबतच्या नात्याबद्दल कबूली दिली. आता दोघेही एकत्र आनंदी जीवन जगत आहेत.

हेही वाचा :

  1. king of kotha box office collection Day 5 : दुल्कर सलमान स्टारर 'किंग ऑफ कोठा'नं केली बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई....
  2. kajol buys an office space : काजोलने मुंबईत खरेदी केले कोट्यावधीचे ऑफिस; जाणून घ्या किंमत...
  3. Miss World In Kashmir : मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्काने दिली नंदनवनाला भेट, पहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details