मुंबई - Hanuman Vs Guntur Kaaram : साऊथ अभिनेता तेजा सज्जा अभिनीत 'हनुमान' बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. 'हनुमान' चित्रपटानं 4 दिवसांत जगभरात 100 कोटींचा आकडा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. साऊथ अभिनेता महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम'ला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या टक्कर देत आहे. 'हनुमान' चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर 'गुंटूर कारम', 'कॅप्टन मिलर', 'मेरी ख्रिसमस', 'आयलान'आणि 'मिशन चॅप्टर 1' सुरू आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. 'हनुमान' चित्रपटाच्या निर्मात्यांनी राम मंदिर ट्रस्टला 14 कोटी रुपये दान केले आहेत.
'हनुमान' आणि 'गुंटूर कारम'ची कमाई : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'हनुमान'ची एकूण कमाई 'गुंटूर कारम'पेक्षा कमी असली तरी, पाचव्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीत या चित्रपटानं त्याला मागे टाकले आहे. 'गुंटूर कारम'नं पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 10.95 कोटी आणि 'हनुमान'नं 13.11 कोटींची कमाई केली आहे. आता हनुमान वर्ल्डवाइड 150 कोटींकडे वाटचाल करत आहे. 'गुंटूर कारम'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 41.3 कोटीची कमाई केली. दुसरीकडे 'हनुमान' चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 8.05 कोटीचा व्यवसाय केला होता. 'गुंटूर कारम'चे एकूण पाच दिवसांचे देशांतर्गत कलेक्शन 93.95 कोटींवर पोहोचले आहे. याशिवाय 'हनुमान'चं कलेक्शन 68.96 कोटी झालं आहे. आज 17 जानेवारीला 'गुंटूर कारम' आणि 'हनुमान' यांनी रिलीजच्या सहाव्या दिवसात प्रवेश केला आहे.