मुंबई - साऊथ आणि बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्या मेहंदी सोहळ्यानंतर आता संगीत सोहळ्याची एक अप्रतिम झलक समोर आली आहे. हंसिका बिझनेसमन सोहेल कथुरियासोबत लग्न करणार आहे. येत्या ४ डिसेंबरला हे जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. आता हंसिका-सोहेलच्या संगीत सोहळ्याची काही झलक समोर आली आहे. यामध्ये हंसिका-सोहेल खूपच सुंदर दिसत आहेत.
सुंदर कपलमध्ये दिसली हंसिका मोटवानी - हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया यांचा संगीत सेरेमनी सुफियाना स्टाईलमध्ये पार पडला. येथे कपलने सुफियाना लूक धारण केला होता. हंसिकाच्या पतीने एक व्हिडिओ व्हायरल केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या संगीत सेरेमनीच्या कार्यक्रमात प्रवेश करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सोहेलने लिहिले आहे, 'ड्रीमी एन्ट्री'. कपलच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.
हंसिका मोटवानीचा मेहंदी सेरेमनी - काल, मेहंदी सेरेमनीमध्ये हंसिका मोटवानी लाल रंगाच्या शराराच्या सेटमध्ये दिसली आणि अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मोठे हास्य होते. घरात आनंदाचे वातावरण असून लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.
लग्न कधी आहे? - मीडियानुसार, आता अभिनेत्रीच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. साऊथ चित्रपटांतील सक्रिय अभिनेत्री हंसिका ४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. राजस्थानमधील 450 वर्षे जुन्या किल्ल्यात हंसिकाचे लग्न होणार आहे.