मुंबई - Guntur Kaaram Collection Day 1 :'गुंटूर कारम' 12 जानेवारी रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रिलीज होताचं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. 'गुंटूर कारम'चं दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास यांनी केलं आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी 50 कोटींचा व्यवसाय करू शकतो, असा अंदाजही वर्तवला जात होता. 'गुंटूर कारम'नं पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग करून सनी देओलच्या 'गदर 2'लाही मागे टाकले आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'गदर 2'च्या पहिल्या दिवसाचे जगभरातील कलेक्शन 40.10 कोटी रुपये आहे, तर महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम'चं पहिल्या दिवसाचं कलेक्शन 42 कोटीची कमाई देशांतर्गत केली. या चित्रपटानं जगभरात 75 कोटीची कमाई केली आहे.
'गुंटूर कारम' चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग :'गुंटूर कारम' आणि कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर 'मेरी ख्रिसमस' चित्रपट एकच दिवशी रिलीज झाले. 'गुंटूर कारम' हा चित्रपट पाहण्यासाठी पहिल्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने करोडो रुपयांची कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार पहिल्याच दिवशी देशभरात 11 लाख 11 हजार 772 रुपयांची तिकिटे विकल्या गेली होती. 'गुंटूर कारम'नं अॅडव्हान्स बुकिंगद्वारे 24.79 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचा प्रचंड क्रेझ सध्या पाहायला मिळत आहे.