महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

महेश बाबूचा 85 फूट कट आऊट, 'गुंटूर कारम' होणार 'या' दिवशी रिलीज - महेश बाबू

Guntur Kaaram : साऊथ अभिनेता महेश बाबू अभिनीत 'गुंटूर कारम' हा रुपेरी पडद्यावर 12 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान रिलीज पूर्वी विजयवाडा सिटी राज थिएटरच्या बाहेर महेश बाबूचा 85 फूट कट आऊट उभारला गेला आहे.

Guntur Kaaram
गुंटूर कारम

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 5:34 PM IST

मुंबई - Guntur Kaaram: साऊथ अभिनेता महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम' हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 'गुंटूर कारम' त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. आता अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान परदेशात या चित्रपटाची प्री-सेल सुरू झाली आहे. 'गुंटूर कारम' चित्रपट आगाऊ बुकिंगमध्ये मोठी कमाई करत आहे. महेश बाबू स्टारर हा चित्रपट 6 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता, पण काही कारणामुळं या चित्रपटाची प्रदर्शनाची डेट समोर ढकलण्यात आली होती. आज 6 जानेवारी रोजी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे.

महेश बाबू स्टारर हा चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित : 'गुंटूर कारम' चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर माहिती दिली आहे की, ''आज 6 जानेवारी रोजी होणारा प्री-रिलीज कार्यक्रम काही कारणास्तव रद्द करण्यात आला आहे.'' गुंटूर कारम'बद्दल सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा सुरू आहेत. दरम्यान विजयवाडा सिटी राज थिएटरच्या बाहेर महेश बाबूचा 85 फूट कट आऊट उभारण्यात आला आहे. महेश बाबूचे चाहते आता उद्याची म्हणजेच 7 जानेवारीची सध्या वाट पाहात आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 12 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. नुकतीच बातमी आली होती की 'गुंटूर कारम' चित्रपट आता उत्तर भारतात हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.

'गुंटूर कारम' चित्रपटाची स्टार कास्ट : या चित्रपटामध्ये महेश बाबू व्यतिरिक्त श्रीलीला, मीनाक्षी चौधरी, ब्रह्मानंदम, रम्या कृष्णन, जगपती बाबू,प्रकाश राज, मुकेश ऋषी, आशीष विद्यार्थी, रेखा आणि इतर कलाकार दिसणार आहेत. 'गुंटूर कारम' या चित्रपटाचा क्रेझ पाहायला सध्या मिळत आहे. महेश बाबू त्याच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट हरिका आणि हसीन क्रिएशन्स द्वारे एस. राधा कृष्ण यांनी निर्मित केला आहे. महेश बाबूच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'एसएसएमबी 29' (SSMB 29) या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय तो रुपेरी पडद्यावर 'जन गण मन' चित्रपटामध्ये झळकेल.

हेही वाचा :

  1. 'डंकी'च्या सक्सेस पार्टीमधील शाहरुख खान राजकुमार हिरानी आणि अनिल ग्रोवरचे फोटो व्हायरल
  2. 'सालार'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच, पाहा किती झाली कमाई
  3. मुंबई संस्कृती महोत्सवाच्या 32 व्या सोहळ्यात रसिकांना मिळणार संगीताची पर्वणी

ABOUT THE AUTHOR

...view details