मुंबई : नव्या पिढीसमोर 'रामायण' नव्या पद्धतीने आणण्यासाठी दिग्दर्शक ओम राऊत 'आदिपुरुष' बनवत आहेत. या चित्रपटात तंत्रज्ञान आणि व्हीएफएक्सचा आधुनिक वापर करून रामायणाची कथा समोर आणली जात आहे. या चित्रपटात रामचंद्रच्या भूमिकेत प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंह आहेत. आता या चित्रपटातील 'जय श्री राम' हे नवीन गाणे लॉन्च झालेे आहे. मुंबईत पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात हे गाणे लॉन्च झाले. यामध्ये संगीतकार जोडी अजय अतुल यांनी हे गाणे प्रेक्षकांसमोर लाईव्ह परफॉर्म केले.
मनोज मुनतासीर शुक्ला यांनी लिहिलेले हे गाणे अजय अतुलने संगीतबद्ध केले आहे आणि गायले आहे. हे गाणे चित्रपटाची मुख्य कल्पना पकडते हे वेगळे सांगायला नको. रामकथा आधुनिक दृष्टिकोनातून मांडायची आहे, असे दिग्दर्शकाने आधीच सांगितले होते. देश-विदेशातील ज्यांना रामायणात रस नाही, त्यांनाही या चित्रपटाची आवड निर्माण होईल, अशी त्यांची अपेक्षा आहे. या चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. रामजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्येत या चित्रपटाचा टीझर निर्मात्यांनी रिलीज केला आहे