महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Grammys awards 2023: भारताच्या रिकी केजने तिसऱ्यांदा जिंकली ग्रॅमी पुरस्काराची ट्रॉफी - Ricky Cage won his third Grammy Award

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील क्रिप्टो डॉट कॉम एरिना येथे झालेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय संगीतकार रिकी केजने बाजी मारली आहे. डिव्हाईन टाइड्स या प्रशंसीत अल्बमसाठी रिकी याला पुरस्काराची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

संगीतकार रिकी केज
संगीतकार रिकी केज

By

Published : Feb 6, 2023, 9:39 AM IST

Updated : Feb 6, 2023, 9:46 AM IST

लॉस एंजेलिस - संगीतकार रिकी केजने सोमवारी रॉक-लेजेंड स्टीवर्ट कोपलँडसह डिव्हाईन टाइड्स अल्बमसाठी तिसरा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. तमाम भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. बेंगळुरूस्थित भारतीय संगीतकार आणि निर्मात्याने 'डिव्हाईन टाइड्स'साठी हा पुरस्कार जिंकला आहे. त्याला सर्वोत्कृष्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम श्रेणीत नामांकन मिळाले होते. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील क्रिप्टो डॉट कॉम एरिना येथे झालेल्या समारंभात हा निकाल जाहीर करण्यात आला.

रिकीचा कोपलँडसोबत दुसरा ग्रॅमी पुरस्कार - 2022 मध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बमसाठी आणखी एक ग्रॅमी जिंकल्यानंतर हे गाणे केजचा स्टीवर्ट कोपलँड सोबतचा सहयोगी प्रोजेक्ट होता. संगीतकार रिकी केजने त्याच्या 2015 अल्बम विंड्स ऑफ संसारासाठी देखील हा पुरस्कार जिंकला आहे. जगभरातील कलाकारांसह, डिव्हाईन टाइड्स ही आपल्या नैसर्गिक जगाच्या भव्यतेला दिलेली सलामी आहे. समीक्षकांनी प्रशंसित केलेल्या या अल्बममध्ये 9 गाणी आणि 8 म्युझिक व्हिडिओ आहेत जे भारतीय हिमालयाच्या अत्युत्तम सौंदर्यापासून ते स्पेनच्या बर्फाळ जंगलापर्यंत जगभरात चित्रित केले गेले आहेत.

नामांकनानंतर केजची भावना - नामांकनाच्या वेळी केज म्हणाला की, आमच्या 'डिव्हाईन टाइड्स' या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कारासाठी दुसऱ्यांदा नामांकन मिळणे हा अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे. माझे संगीत परस्पर-सांस्कृतिक असले तरी, त्याची भारतीय मुळे नेहमीच मजबूत आहेत. मला खूप अभिमान आहे की भारतीय संगीताला या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी द रेकॉर्डिंग अकादमीने ओळखले आणि शॉर्टलिस्ट केले आहे. नामांकनामुळे मला आणखी प्रोत्साहन मिळते आणि सकारात्मक सामाजिक प्रभावांना प्रेरणा देणारे संगीत बनवत राहण्याचा माझा विश्वास दृढ होतो.ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा रिकी हा भारतातील सर्वात तरुण व्यक्ती आहे आणि तो फक्त चौथा भारतीय आहे. दरम्यान, स्टीवर्ट कोपलँड हे 5 वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते अमेरिकन संगीतकार आहेत. ते ब्रिटीश रॉक ग्रुप 'द पोलिस' चे संस्थापक आणि ड्रमर आहेत ज्यांचे जगभरात 75 दशलक्ष अल्बम विकले आहेत.

केजने व्यक्त केली कृतज्ञता - भारतीय संगीतकार रिकी केजने ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्ससोबत शेअर करताना लिहिले की, आज आमच्या अल्बम डिव्हाईन टाइड्ससाठी ग्रॅमी अवॉर्ड जिंकला. कृतज्ञतेने आणि प्रेमाने भरलेला हा जिवंतदिग्गज माझ्यासोबत उभा आहे. माझा दुसरा ग्रॅमी आणि स्टीवर्टचा 6वा पुरस्कार आहे. ज्यांनी कधी सहयोग केले, कामावर घेतले किंवा माझे संगीत ऐकले, अशा प्रत्येकजणाला, त्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्यामुळे अस्तित्वात आहे. बेनी दयाल आणि श्रेया घोषाल यांच्यासह संपूर्ण भारतातून त्यांच्यासाठी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा -Grammy Award 2023 : अभिनेत्री व्हायोला डेव्हिसने तिच्या आत्मचरित्राच्या ऑडिओ बुकसाठी जिंकला ग्रॅमी अवॉर्ड

Last Updated : Feb 6, 2023, 9:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details