मुंबई - 80 आणि 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांची मने जिंकणारा 'हिरो नंबर-1' गोविंदा ( Heero No. 1 Govinda ) आज भलेही चित्रपटांमध्ये दिसत नसेल, पण त्याचे चाहते आजही कमी झालेले नाहीत. गोविंदा सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहतो आणि त्यांच्यासोबत डान्स आणि स्टाइलचे फोटो शेअर करत असतो. आता गोविंदाने सोशल मीडियावर सांगितले आहे की, त्याचे मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे.
गोविंदाने ( Govinda ) त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ गुरुवारी सकाळी 9.30 वाजता शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये गोविंदा हिंदी सिनेसृष्टीची ड्रीम गर्ल हेमा मालिनीची मुलगी ईशा देओलसोबत ( Hema Malini Daughter Esha deol ) डान्स करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये गोविंदा आणि ईशा 'आप के आ जाने से' या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये गोविंदा आणि ईशाचा कॅज्युअल लूक परफेक्ट दिसत आहे.