मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एक तारा निखळला ( Manju Singh Passes Away ) आहे. ज्येष्ठ हिंदी अभिनेत्री मंजू सिंग (Manju Singh) यांचे वयाच्या ७३ व्या वर्षा निधन झाले. याबाबत गीतकार, आणि पटकथा लेखक स्वानंद किरकिरे यांनी मंजू सिंग यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत त्यांनी दूरदर्शनमध्ये त्यांच्यासोबत काम केल्याची आठवण सांगितली आहे.
स्वानंद यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'मंजू सिंग राहिल्या ( Manju Singh dies ) नाहीत! दूरदर्शनसाठी स्वराज हा कार्यक्रम लिहिण्यासाठी मंजूजींनी मला दिल्लीहून मुंबईत बोलावले होते! डीडीसाठी त्यांनी एक कहानी, शो टाईम इत्यादी अनेक उत्कृष्ठ शो केले होते. हृषीकेश मुखर्जी यांच्या गोलमाल चित्रपटामधील ( Golmaal fame actress dies ) रत्ना आपली प्रेमळ मंजू जी तुमचे प्रेम कसे विसरु शकेल…!'