पणजी ( गोवा ) - तेराव्या मराठी चित्रपट महोत्सवाचे गोव्यात आयोजन करण्यात आले आहे. 5 ते 7ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवाचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी संध्याकाळी मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठीतील सदाबहार अभिनेता अशोक सराफ यांचा कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अशोक सराफ यांच्या अनुपस्थित हा पुरस्कार त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी स्वीकारला. पाच ते सात ऑगस्ट चालणाऱ्या या मराठी चित्रपट महोत्सवात मराठीतील वीस अधिक चित्रपट दाखविले जाणार आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत , मृणाल कुलकर्णी, मोहन आगाशे, मिलिंद गुणाजी, पुष्कर श्रोत्री, निवेदिता सराफ व अन्य मराठी कलाकारांच्या उपस्थितीत करण्यात आले. या चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांचा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अशोक सराफ यांना कृतज्ञता पुरस्कार- यावेळी मराठीतील सदाबहार अभिनेते अशोक सराफ यांना त्याच्या चित्रपटातील कार्याबद्दल तेराव्या चित्रपट महोत्सवात कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या अनुपस्थित हा पुरस्कार त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी स्वीकारत आयोजकांचे आभार मानले.