महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने केले सार्वजनिक ठिकाणी 'असे' कृत्य, म्हणाली, त्याची मला लाज वाटते... - Global star Priyanka Chopra

प्रियांका चोप्राने एका मुलाखती दरम्यान तिच्या सोबत मेक्सिकन फूड खाल्ल्यानंतर झालेला एक लाजिरवाणा किस्सा सांगितला. या मुलाखती दरम्यान तिने तिच्या नाकाच्या शस्त्रक्रियेबद्दल तिला बऱ्याच चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती असे तीने सांगितले होते.

Priyanka Chopra
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा

By

Published : May 6, 2023, 10:49 PM IST

मुंबई : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा निर्भयपणे कॅमेरा किंवा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत सर्व काही शेअर करते. एका मुलाखतीत देसी गर्लने खुलासा करताना एक आठवण शेअर केली. प्रियांकाने सांगितले की, एकदा मेक्सिकन फूड खाल्ल्यानंतर तिच्यासोबत काहीतरी 'लाजिरवाणे' घडले. खुलासा करताना ती म्हणाली की, एकदा तिने सार्वजनिक ठिकाणी फर्ट केले होते, त्यामुळे मला खुप लाज वाटली होती असा किस्सा तीने शेअस केला आहे.

मेक्सिकोत घडला लाजिरवाणा किस्सा : ही गोष्ट कोणालाच माहीत नव्हते. मात्र, अभिनेत्रीने ही घटना कधी आणि कुठे घडली याचा खुलासा केला नाही. प्रियंका सर्व काही आपल्या चाहत्यांना सांगत असते. त्यामुळे अनेकदा तीला वाईट परिस्थितीचा देखील अनुभव आला आहे. तीने एकदा नाव न घेता प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्यावरसुद्धा टीका केली होती. अशी वक्तव्याचे तीला अनेकदा परिणाम भोगावे लागले आहेत. त्यामुळे प्रियंकाला बॉलीवूडमध्ये काम मिळणे कठीण झाले होते. त्यामुळेच ती हॉलिवूडमध्ये गेली असे प्रियांका अनेकदा सांगते. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या नाकाच्या सर्जरीबद्दल खुलासा केला होता. त्या वेळी, तिला अनेक चित्रपटांमधून नाकारण्यात आल्याचे तीने अनेकदा सांगितले आहे. ती अशा घटनामुळे नैराशात गेल्याचे तीने सांगितले होते.

'जी ले जरा' या चित्रपटात झळकणार प्रियंका: प्रियंकाच्या, वर्क फ्रंटवर बोलायला गेले तर ती पती-गायक निक जोनाससह काही दिवसांपुर्वी न्यूयॉर्कमध्ये लव्ह अगेनच्या प्रीमियरला उपस्थित होती. या चित्रपटात प्रियांका,सॅम ह्युघन मुख्य भूमिकेत आहेत. निकने चित्रपटात छोटी भूमिका साकारली आहे. प्रियंकाची सिटाडेल ही वेब सिरीजही नुकतीच प्रदर्शित झाली आहे. यासाठी प्रेक्षकांकडून तिचे कौतुक होत आहे. प्रियांका लवकरच फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांकासोबत आलिया भट्ट, कॅटरिना कैफ देखील दिसणार आहेत. आता प्रियंकाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार हे येणाऱ्या काळात आपल्या समजेल.

  • हेही वाचा -
  1. Ravarambha release : स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्याची यशोगाथा रावरंभा प्रेक्षकांच्या भेटीला
  2. Hollywood writers strike : हॉलिवूडमधील लेखकांच्या संपामुळे मार्वल स्टुडिओने ब्लेडचे शुटिंग पुढे ढकलल
  3. 'IB 71' release : विद्युत जामवालची जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्स असलेला 'आयबी 71' रिलीजसाठी सज्ज

ABOUT THE AUTHOR

...view details