महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ghoomer trailer out: हात गमवलेल्या झुंझार क्रिकेटरची प्रेरणादायी कथा 'घुमर' - सयामी खेर

सयामी खेर आणि अभिषेक बच्चन स्टारर 'घुमर' चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. एक हात असलेल्या एका जिद्दी महिला क्रिकेटरची कथा यात पाहायला मिळणार आहे. एकच डावा हात असलेल्या मुलीचा क्रिकेटचे प्रशिक्षण देऊन तिला लढण्यासाठी सज्ज करणाऱ्या क्रिकेट कोच आणि खेळाडूची ही कथा आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Aug 4, 2023, 1:23 PM IST

मुंबई - सयामी खेर आणि अभिषेक बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'घूमर'चा ट्रेलर शुक्रवारी रिलीज झाला. ट्रेलरमध्ये पॅराप्लेजिक खेळाडू सयामीची प्रेरणादायी कथा दाखवण्यात आली आहे. आर बाल्की दिग्दर्शित हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'घुमर' चित्रपटाचा ट्रेलर सुरू होतो तेव्हा कोचच्या भूमिकेत असलेल्या अभिषेक बच्चनचे बोल ऐकू येतात. तो म्हणतो, 'लॉजिकली एक हात से देश के लिए कोई खेल सकता है. नो, लेकिन ये लाईफ ना लॉजिक का खेल नहीं है, यह मॅजिक का खेल है. मॅजिक...' त्याच्या या आवाजावर भारतीय महिला संघाचे खेळाडू स्टेडियममध्ये जाताना दिसतात. तिरंग्यासोबत डावा हात उंचावलेली सयामी खेर भारताची जर्सी परिधान करुन मैदानात उतरलेली दिसते.

ट्रेलरच्या पुढील दृष्यात अभिनेत्री सयामी खेर एका हाताने क्रिकेटसाठी प्रचंड मोहनत घेताना दिसते. तिचा सराव अत्यंत खडतर आहे. जिद्द आणि महत्त्वकांक्षेच्या जोरावर भारतासाठी गोलंदाजी करणाऱ्या एका झुंझार महिला खेळाडूची कथा पडद्यावर साकारली जाणार आहे. या चित्रपटातील संवाद जबरदस्त आहेत. ट्रेलरची सुरूवात अशाच दमदार संवादाने होते आणि एक संवाद आपल्याला आणखी लक्ष वेधून घेतो. कोच असलेला अभिषेक बच्चन म्हणतो, 'जिंदगी भर एकही चीज साफ करने वाला ये तुम्हारा बाया हात, अचानक एक दिन बोलिंग कर पायेगा.' तिला एकच हात असल्याचे सांगतानाचाही त्याचा संवादही सुंदर आहे.

आर बाल्की यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या घुमर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शबाना आझमी आणि अमिताभ बच्चन यांचीही झलक पाहायला मिळते. या चित्रपटात अंगद बेदीचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या महिला खेळाडूचा हात एका अपघातात तुटतो आणि क्रिकेट खेळण्याचे आयुष्यभर उरी बाळगलेले स्वप्न मावळते. तिला या अवस्थेतू बाहेर काढण्यासाठी कोच पुढे येतो आणि तिच्यात एक हातानेही खेळण्याची क्षमता असल्याचे सांगून प्रेरित करतो. तिला एक नवीन ध्येय देतो आणि अत्यंत कल्पक प्रशिक्षणाने तिचे नशीब बदलते, तिला भारतीय क्रिकेट संघासाठी पुन्हा एकदा गोलंदाज म्हणून निवडले जाते, हा प्रेरणादायी संघर्ष आपल्याला 'घुमर'मध्ये पाहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details